भारत असो कि पाक, हिंदूंची बाजू मांडणार्या प्रत्येकालाच धर्मांधांकडून विरोध होतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : पाकमधील हिंदूंच्या होणार्या धर्मांतराचा विरोध करणारे तेथील खासदार लालचंद माल्ही यांना धर्मांधांकडून विरोध होऊ लागला आहे. माल्ही रॉचे हस्तक आहेत, असा आरोप करण्यात आला आहे; मात्र काही जणांनी माल्ही यांचे समर्थनही केले आहे. सिंधी धर्मगुरु पीर आयूब जां सरहंदी यांनी माल्ही यांच्यावर ते रॉचे हस्तक असल्याचा आरोप केला आहे. पीर अयूब पाकमध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत.
ऑल पाकिस्तान फेमिनिस्ट असोसिएशनच्या संस्थापिका शुमैला एच्. शाहनी यांनी माल्ही यांना पाठिंबा देतांना म्हटले की, पाकमध्ये अल्पसंख्यांकांवर अशा प्रकारचा आरोप करणे आणि त्यांना ब्लॅकमेल करणे नेहमीचेच झाले आहे. त्यांनी ट्विट करतांना म्हटले की, जेव्हा हिंदू त्यांच्यावरील अन्यायाला विरोध करण्यासाठी आवाज उठवतात, तेव्हा धर्मांध त्यांना गप्प करण्यासाठी त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करतात.
पाकच्या संसदेत गेल्या वर्षी अल्पसंख्यांक समाजातील महिलांचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांच्याशी विवाह करण्यावर प्रतिबंध आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात माल्ही यांनी प्रस्ताव सादर केला होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात