Menu Close

राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शास्त्रानुसार गणेशमूर्तीची स्थापना करा या मागण्यांसाठी ठिकठिकाणी निवेदने

निवेदन स्वीकारतांना तहसीलदार डावीकडे श्री. सुरेश काशीद

रोहा : राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने कारवाई करावी, यासाठी येथील तहसीलदार श्री. सुरेश काशीद यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. किसान घाग, शिवसेनेचे श्री. विष्णू लोखंडे, श्री. तुषार खरिवले, श्री. उत्तम नाईक, श्री. सुधाकर शिलधनकर उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


बेळगाव येथे राष्ट्रध्वजाचा मान राखा यासंदर्भात निवेदन

बेळगाव : येथे राष्ट्रध्वजाचा मान राखा यासंदर्भात जिल्हाशिक्षणाधिकारी यांच्या वतीने श्री. पाटील आणि श्री. मंजुनाथ जानकी यांनी निवेदन स्वीकारले. पोलीस आयुक्त कृष्णा भट्ट यांनाही निवेदन दिले.

या वेळी हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. रवी कोकितकर, बजरंग दलाचे श्री. आदिनाथ गावडे, श्री. संतोष कडोलकर, तसेच भाजपचे अनिल कुरणकर आणि मोहन पाटील, कर्तव्य महिला मंडळाच्या सौ. आक्काताई सुतार, श्री. मिलन पवार, तुळजाभवानी महिला मंडळाच्या सौ. अर्चना पाटील, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक, अन्य राष्ट्रप्रेमी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


सोलापूर येथे राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शास्त्रानुसार गणेशमूर्तीची स्थापना करा या मागण्यांसाठी निवेदने

सोलापूर येथील कनिष्ठ प्रशासन अधिकार्‍यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी

सोलापूर : येथील निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शास्त्रानुसार गणेशमूर्तीची स्थापना करा, या मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. राष्ट्रध्वजाचा मान राखा, या मागणीसाठी येथील माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयातही निवेदन देण्यात आले. या वेळी कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. एस्.डी. बोरुटे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी तळे हिप्परग्याचे माजी सरपंच राजकुमार हौशेट्टी, मनसेे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अमर कुलकर्णी, प्रसाद नाझरे, रणधीर स्वामी, अजय मेनकुदळे, प्रसाद पाटील, तिरुमल श्रीराम, शहाजी माळी, दयानंद केंभावी यांसह २० राष्ट्रप्रेमी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


लातूर येथे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

लातूर : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांना निवेदन यांना निवेदन देण्यात आले.

लातूर येथील उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी

धाराशिव येथे जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना निवेदन

धाराशिव : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी श्री. राधाकृष्ण गमे आणि शिक्षणाधिकारी श्री. सचिन जगताप यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. शरद गणेश, सनातन प्रभातचे वाचक श्री. भगवान श्रीनामे, सनातन संस्थेच्या साधिका उपस्थित होत्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *