प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यावर बंदीघालण्याची कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
बेंगळुरू : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राज्यातील शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री तन्वीर सैत यांना४ ऑगस्ट या दिवशी देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या कु. भव्या गौडा, श्री. मंजुनाथ, श्री. अभिलाश आणि अधिवक्ता पद्मनाभ होळ्ळा यांनी हे निवेदन दिले.
स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारपर्यंत मुले प्लास्टिकचे आणि कागदाचे राष्ट्रध्वज रस्त्यावर अन् कचर्याच्या टोपलीमध्ये फेकून देतात. प्लास्टिकचे ध्वज नष्ट करणेही कठीण असते. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. भारतीय राज्यघटनेतील ५१ (अ) कलमानुसार राष्ट्रध्वजाचा मान राखणे, हे प्रत्येक नागरिक आणि शासन यांचे मुख्य कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा अयोग्य वापर आणि अवमान हा राज्यघटनेनुसार शिक्षापात्र गुन्हा आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयीच्या शासनाच्या निर्णयाची कडक कार्यवाही करण्यात यावी. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन इत्यादी दिवसांत शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यावर संपूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
फरिदाबाद येथील दोन शाळांमध्ये प्रवचन
फरिदाबाद : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील शास्त्री कॉलनीमधील दोन शाळांमध्ये नुकतेच राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर प्रवचन करण्यात आले. या प्रवचनांचा लाभ १६० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक यांनी घेतला. या वेळी समितीच्या श्रीमती रिद्धि अग्रवाल यांनी येथील न्यू विद्या मंदिर सीनियर सेकंडरी स्कूलमध्ये, तर कु. नीलू राणा यांनी गोल्डन ओक पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्याविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.
शिवमोग्गा आणि तीर्थाहळ्ळी (कर्नाटक) येथे जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार यांना हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन
शिवमोग्गा ( कर्नाटक) : स्वातंत्र्यदिनानिमित्त प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात आल्यावर त्याचा अवमान होत असल्याने येथील जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक, तसेच तिर्थाहळ्ळीचे तहसीलदार यांना हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन देण्यात आले. अशा प्रकारे होणारा अवमान रोखण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. शिवमोग्गा येथे समितीचेसर्वश्री विश्वनाथ, महेश, सुंदरमूर्ती, सौ. सेल्वी, सौ. सुधा कामत, कु. वनिता मोगेर आणि अन्य धर्माभिमानी उपस्थित होते. तिर्थाहळ्ळी येथे समितीच्या सौ. शोभा गुरुराज, सर्वश्री प्रभाकर पडियार, दिनेश, पद्मनाभ, सौ. ममता, सौ. मोहिनी, सौ. पार्वती आदी धर्माभिमानी उपस्थित होते.
देहली येथे प्रशासनाला निवेदन सादर
देहली : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होणार्या राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील उपराज्यपाल अनिल बैजल, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांचे स्वीय साहाय्यक, जिल्हाधिकारी बलवंत सिंह जागलान, शिक्षण संचालक सौ. सौम्या गुप्ता यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. सुदर्शन गुप्ता आणि श्री. कार्तिक साळुंके उपस्थित होते.
क्षणचित्र :
यावेळी जिल्हाधिकारी बलवंत सिंह जागलान यांनी सनातन आणि समिती यांचे कार्य समजून घेतले, तसेच कार्याची प्रशंसा केली. या वेळी ते म्हणाले, या निवेदनाविषयी बैठकीमध्ये चर्चा करू, तसेच माझ्याकडून जेवढे सहकार्य होईल तेवढे नक्की करीन.
गुरुग्राम (हरियाणा) येथे उपायुक्तांना निवेदन
गुरुग्राम (हरियाणा) : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील उपायुक्त विनय प्रताप सिंह यांना निवेदन देण्यात आले. या वेळी गेल्या १४ वर्षांपासून राष्ट्रध्वजाविषयी समिती करत असलेल्या चळवळीची माहिती देण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
अंबाजोगाई (जिल्हा बीड) : सहस्रो क्रांतीवीरांचे बलीदान आणि त्याग यांचे मानचिन्ह असलेल्या राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्यासाठी कार्यवाही करावी, यासाठी येथील नायब तहसीलदार श्री. सूर्यकांत आवाड यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री बालाजी सुरवसे, बालाजी भारजकर, दत्ता माने, भागवत काळे, संदीप पंडित, आकाश चौरे, गोविंद हावळे, मंगेश बारस्कर आदी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात