सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पोलीस, प्रशासकीय अधिकारी, आमदार, तसेच अन्य मान्यवर यांना ७ ऑगस्ट या रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यात आली. सर्वांनीच या उपक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्रात झालेल्या या उपक्रमाचा छायाचित्रात्मक वृत्तांत येथे देत आहोत.
सांगली
गणेशोत्सवाच्या संदर्भात विषय मांडतांना समितीच्या पत्रकातील मजकुराचा उपयोग करेन ! – प्रताप मानकर
गणेशोत्सवाच्या बैठका पोलीस प्रशासनाच्या वतीने गावागावातही आयोजित केल्या जातात. या बैठकांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या पत्रकांमधील मजकुराचा उपयोग करेन, असे मत ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर यांनी व्यक्त केले. श्री. मानकर यांनी समिती चांगले काम करत असल्याचे सांगितले.
एकलव्य प्री. प्रायमरी शाळेतील संस्थापक श्री. रणजीत कदम, हिंदु धर्माभिमानी श्री. विजय महाडिक यांनाही राखी बांधण्यात आली.
मुंबई
नागपूर
पोलीस निरीक्षक श्री. गायकवाड, काळे एंटरप्राईजेसचे श्री. मनिष काळे, साईकृपा ज्वेलर्सचे श्री. पंकज सुंभाटे आणि त्यांचे बंधू, मांगलकर ज्वेलर्सचे श्री. मांगलकर, शेवाळकर डेव्हलपर्सचे श्री. आशुतोष शेवाळकर, वर्धा येथील भाजपचे आमदार श्री. पंकज भोयर, एस्.एम्. कॉम्प्युटरचे श्री. श्रीपाद देशपांडे आणि एक्काडेज स्ट्रक्चरल कन्सल्टंटचे श्री. वीरेंद्र डेहड्राय, अर्पणदाते श्री. लिंबानी, श्री. पटेल यांना राखी बांधण्यात आली.
सोलापूर
१. अकलूज : येथील पोलीस निरीक्षक श्री. सावंत यांनी सनातन संस्थेच्या रक्षणार्थ मी नेहमी सिद्ध आहे, असे सांगितले.
२. माळशिरस : येथील नायब तहसीलदार श्री. नामदेव काळे यांना राखी बांधली.
३. धाराशिव : धर्माभिमानी श्री. प्रशांत कुडाळ यांना राखी बांधण्यात आली.
४. बार्शी (जिल्हा सोलापूर) : तहसीलदार श्री. शेळके, बार्शी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेता श्री. नागेश अक्कलकोटे, माजी नगराध्यक्ष श्री. विश्वास बारबोले, उपनगराध्यक्ष श्री. बाळकृष्ण बारबोले यांना राखी बांधण्यात आली.
१. विश्वास बारबोले म्हणाले, कृत्रिम हौदात मूर्तीविसर्जन होऊ देणार नाही. मी चिनी वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार घातला आहे.
२. कृष्णराज बारबोले म्हणाले की, या वर्षी नगरपालिकेमध्ये शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणार. तसेच त्याविषयी प्रबोधन करणार.
३. नागेश अक्कलकोटे हे रुग्णालयात असूनही त्यांनी राखी बांधण्यासाठी बोलावले.
४. श्री. शेळके यांनी शांतता समितीच्या बैठकीत आदर्श गणेशोत्सव, शाडूमातीच्या मूर्तीचे महत्त्व यांविषयी प्रबोधन करतो. तसेच प्लास्टिकच्या ध्वजाविषयी आदेश काढतो, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात