पुसद येथे प्रशासनाला निवेदन
पुसद (जिल्हा यवतमाळ) : प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी येथील पोलीस ठाणेदार श्री. खिल्लारे आणि उपविभागीय अधिकारी श्री. हिंगोले यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी श्रीराम जन्मोत्सव समितीचे श्री. रविभाऊ ग्यानचंदानी, विश्व हिंदु परिषदेचे श्री भारत अण्णा पेंशणवार, भाजपचे श्री. धनुभाऊ अत्रे, श्री. विश्वास भवरे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
कुर्ला ते मुलुंड या विभागाचे, तसेच वसई येथील तहसीलदारांना निवेदन
मुंबई : प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर प्रतिबंध घालावेत आणि जिल्हा अन् विभाग स्तरावर कृती समिती नेमून त्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे या मागण्यांसाठी मुंबईतील कुर्ला ते मुलुंड या विभागाचे तहसीलदार डॉ. संदीप माने आणि वसई विभागाचे तहसीलदार श्री. क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले. वसईच्या तहसीलदारांच्या नावे दिलेले निवेदन त्यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार अर्चना खंडागळे यांनी स्वीकारले. तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी वसई येथे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेचे नालासोपारा येथील शाखाप्रमुख श्री. जीतेंद्र हजारे, तसेच राष्ट्रप्रेमी सर्वश्री भालचंद्र टिळक आणि जयेश पाटील उपस्थित होते, तर मुलुंड येथे राष्ट्रप्रेमी सर्वश्री विनायक साळुंखे, विलास पाटील आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश घाटकर उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात