सहस्रो हिंदूंचा रेटा पहाता मध्यप्रदेशातील भाजप शासन हिंदूंना भोजशाळेत पूर्ण दिवस पूजा करण्याची अनुमती देईल का ?
हिंदूबहुल भारतात हिंदूंना न्याय्यहक्कांसाठी असे लढावे लागते, हे अत्यंत दुर्दैवी होय ! हिंदु राष्ट्रातच हिंदूंना खर्या अर्थाने न्याय मिळेल !
वसंतपंचमीच्या दिवशी भोजशाळेला जाण्याचे हिंदूंना करण्यात आले आवाहन !
धार (मध्यप्रदेश) : १२ फेब्रुवारीला वसंतपंचमी आहे. यादिवशी सूर्योदयापासून दुपारी १२ पर्यंत आणि दुपारी ३.३० नंतर हिंदू भोजशाळेत पूजा करू शकतात, तर दुपारी १ ते ३ या वेळेत मुसलमानांना नमाज पठणासाठी भोजशाळा खुली करण्यात येईल. त्यावेळी हिंदूंना भोजशाळेत जाण्यास अनुमती नसेल, असा आदेश भारतीय पुरातत्व खात्याने दिला आहे. याचा विरोध करण्यासाठी आणि संपूर्ण दिवस केवळ हिंदूंनाच भोजशाळेत जाण्याची अनुमती देण्यात यावी, या मागण्यांसाठी ८ फेब्रुवारीला धारच्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वाहनफेरी काढून हिंदूंमध्ये जागृती निर्माण केली.
१. भोज उत्सव समिती आणि हिंदु जागरण मंचच्या वतीने आयोजित या फेरीत एकूण ३५ सहस्र हिंदु धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला.
२. धार शहरासह जवळच्या गावांमधूनही शेकडो धर्माभिमानी तरुण फेरीत सहभागी होण्यासाठी शहरात दाखल झाले होते.
३. फेरीच्या दोन दिवस आधी फेरीच्या दृष्टीने शहरातील हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पहावयास मिळाला.
४. फेरीच्या वेळी, सहस्रो हिंदूंच्या हातात असलेल्या भगव्या ध्वजांमुळे संपूर्ण शहरच जणू काही भगवेमय झाले होते.
५. जय श्री रामच्या जयघोषांनी आसमंत दणाणला.
६. वाहनफेरीला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाले. बाजारात अनेक हिंदूंनी त्यांची दुकाने बंद ठेवली आणि सहकार्यांसह वाहनफेरीस समर्थन देण्यासाठी रस्त्यांवर उभे राहिले.
७. लहान मुले आणि महिला मोठ्या प्रमाणात फेरीत सहभागी झाल्या होत्या.
८. भाजप खासदार सावित्री ठाकुर आणि आमदार कालूसिंह ठाकुर हे वगळता भाजपचा एकही नेता फेरीला उपस्थित नव्हता.
९. हिंदुत्ववादी संघटनेच्या कर्यकर्त्यांनी शिस्तबद्ध फेरी काढून लोकांचे लक्ष वेधले.
१०. हिंदु नेते अशोक जैन आणि विजयसिंह राठौर यांनी सांगितले की, पोलीस आयुक्त संजय दुबे म्हणाले होते की, वसंतपंचमीला नागरिक कल्पनाही करणार नाहीत एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस बल तैनात करण्यात येईल; परंतु १२ फेब्रुवारीला भोजशाळेत इतके हिंदू येतील की पोलीस आयुक्त कल्पनाही करू शकणार नाहीत.
शीघ्र कृती दलाच्या सैनिकांच्या हातात होत्या विजेचा झटका देणार्या लाठ्या !
यावेळी शीघ्र कृती दलाच्या सैनिकांच्या हातात विजेचा झटका देणार्या लाठ्या आणि अत्याधुनिक शस्त्रे होती. (विजेच्या झटका देणार्या काठ्या आणणारे पोलीस हिंदूंना गुंड आणि हिंसाचारी समजतात का ? अशा प्रकारची शस्त्रे जिहादी आणि गुंडांच्या विरोधात वापरली असती, तर एव्हाना मध्यप्रदेश गुन्हेगारीमुक्त प्रदेश झाला असता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात