वासनांध ख्रिस्ती धर्मगुरु !
हिंदु धर्मगुरूंवर लैंगिक अत्याचाराचा कथित आरोप झाल्यास त्याविषयी ‘ब्रेकिंग न्यूज’ दाखवणारी प्रसारमाध्यमे ख्रिस्ती धर्मगुरूंच्या लैंगिक अत्याचाराविषयी गप्प रहातात. यातून प्रसारमाध्यमांचा बेगडी निधर्मीवाद लक्षात येतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मारिकिना (फिलिपिन्स) : एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून येथील ५५ वर्षीय कॅथलिक धर्मगुरूला पोलिसांनी अटक केली.
मारिकिना शहरातील सेंट जॉन चर्चचे माजी अध्यक्ष आणि केन्टा कॅथलिक कॉलेजचे प्रमुख आर्नेल लेगारेजस या ख्रिस्ती धर्मगुरूने सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीला आणि दलालाला एका शॉपिंग मॉलच्या बाहेर भेटण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्या ख्रिस्ती धर्मगुरूने दलालाला पैसे देऊन अल्पवयीन मुलीला कह्यात घेतले आणि ते हॉटेलच्या दिशेने निघाले. त्यापूर्वी त्या मुलीने ख्रिस्ती धर्मगुरूकडून तिच्यावर होणार्या लैंगिक अत्याचाराची कल्पना तिच्या आईला दिली होती. सदर मुलीच्या आईने त्याविषयी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आर्नेल लेगारेजस यांना कह्यात घेतले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. यापूर्वी दोन वेळा त्या ख्रिस्ती धर्मगुरूने दलालाकडून त्या मुलीला कह्यात घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते; मात्र तिसर्या वेळी ते पोलिसांच्या जाळ्यात सापडलेे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या धर्मगुरूला पाठीशी घालणार नसल्याचे अँटिपोलोच्या डायोसेस संस्थेने म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात