भाजपच्या सरकारमध्ये तरी संस्कृत भाषेला चांगले दिवस येतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : भारतीय संस्कृतीचा गाभा म्हणजे संस्कृत होय. तरीही संस्कृत भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यासाठी मागील सरकारने किंचितही प्रयत्न केला नाही. जोपर्यंत प्राणात प्राण आहे, तोपर्यंत मी संस्कृत भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करीन, असे प्रतिपादन पं. वसंतराव गाडगीळ यांनी केले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ऑगस्ट या दिवशी ४८ वा संस्कृतदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचा लोकमान्य टिळक संस्कृत पुरस्कार पं. वसंतराव गाडगीळ यांना देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी अपर पोलीस महासंचालक (कारागृह) डॉ. भूषणकुमार उपाध्याय, टिळक महाराष्ट्र विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक, डॉ. श्रीकांत बहुलकर उपस्थित होते.
संस्कृत भाषा ही भारतीय संस्कृतीचा आत्मा ! – डॉ. भूषणकुमार उपाध्याय
संस्कृत भाषा ही भारतीय संस्कृती आणि जीवन यांचा आत्मा आहे. भारतीय संस्कृती ओळखायची असेल, तर संस्कृत भाषा अवगत असणे महत्त्वाचे आहे. भारताकडील संस्कृत भाषेतील वेद, पुराणे, उपनिषदे, खंड आत्मसात करण्यासाठी बाहेरील देश सरसावले आहेत. अनेक देशांमध्ये शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये संस्कृत भाषा अनिवार्य आहे; परंतु भारतात संस्कृतची उपेक्षा होते. संस्कृतचे संरक्षण आणि संवर्धन करणे, हे आपले कर्तव्यच आहे. आम्ही बंदीवानांना कारागृहात संस्कृत श्लोक म्हणायला शिकवतो. संस्कृतमुळे आक्रमक वृत्तीचे बंदीवान शांत होतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments