Menu Close

(म्हणे) समानतेच्या हक्काच्या आड धार्मिक प्रथा-परंपरा येता कामा नयेत !

घटना ही अलीकडच्या काळात निर्माण झाली आहे, तर प्रथा-परंपरा या पूर्वापार चालत आल्या आहेत. धर्मशास्त्र प्राचीन काळी ऋषिमुनींनी लिहिले आहे, हे लक्षात घ्यायला हवे !

महाधिवक्ता श्रीहरि अणे यांचे धर्मविरोधी वक्तव्य

मुंबई : नागरिकांच्या समानतेच्या आणि अन्य मूलभूत हक्कांच्या आड धार्मिक प्रथा-परंपरा येता कामा नयेत. प्रार्थनास्थळांमध्ये कोणालाही प्रार्थना करण्यापासून अटकाव कसा काय करता येईल, अशी भूमिका ९ फेब्रुवारी या दिवशी महाधिवक्ता श्रीहरि अणे यांनी उच्च न्यायालयात हाजी अली दर्ग्यातील महिलांच्या प्रवेशबंदीच्या संदर्भात मांडली. (घटनेने धार्मिक प्रथा-परंपरा, उपासना यांच्या पालनेचे अधिकारही दिले आहेत. त्याच्या आडही कोणी यायला नको. शनिशिंगणापूर किंवा हजी अली येथे प्रार्थना करण्यास अटकाव नाहीच ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात ) महाधिवक्त्यांनी ही भूमिका हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्याशी संबंधित प्रकरणी मांडली. अणे यांनी भूमिका मांडल्यावर न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांच्या खंडपिठाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर हाजी अली दर्ग्यासंदर्भातील निर्णय राखून ठेवला.

अणे या वेळी म्हणाले….

१. धार्मिक प्रथा-परंपरांत न्यायालयाने हस्तक्षेप करावा का, हे सांगतांना त्यासाठी त्या परंपरांच्या मुळाशी जावे. हाजी अली दर्ग्याच्या संदर्भात महिलांना प्रवेशबंदी हे इस्लामचे अविभाज्य अंग आहे का, हे पाहिले पाहिजे. एखादी गोष्ट केल्याने वा न केल्याने धर्मच कोसळून पडत असेल, तर न्यायालय आदेश देऊ शकणार नाही. ज्या गोष्टींमुळे धर्मावर काहीही परिणाम होणार नसेल, तेथे न्यायालय आदेश देऊ शकते. (एखादी प्रथा मोडल्याने धर्मावर काय परिणाम होणार आहे, हे धर्मशास्त्राचे अभ्यासकच सांगू शकतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )

२. धर्मपंडित धार्मिक प्रथा-परंपरांचे व्यवस्थापन करू शकतात. त्यासाठी ती प्रथा धर्माचे अविभाज्य अंग किंवा अत्यंत महत्त्वाची असायला हवी. ती प्रथा धर्माचा गौण भाग नसावी. (प्रथा गौण आहे कि महत्त्वाची आहे, हे धर्माचा अधिकार असलेल्या व्यक्तीने ठरवायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात ) एखाद्या प्रथेला थेट कुराणातच आधार असल्याचे दाखवून दिल्यास त्यात न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही. तथापि कुराणातील प्रथेवर कोणा पंडिताने केलेली टिप्पणी धर्माचा अविभाज्य भाग होणार नाही. कारण ती टिप्पणी म्हणजे त्या पंडिताने कुराणाचा लावलेला अर्थ असतो, तो त्या वेळच्या परिस्थितीला अनुसरून असतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *