Menu Close

सोलापूर येथे १५ ऑगस्ट आणि गणेशोत्सव या पार्श्‍वभूमीवर प्रशासन आणि पोलीस यांना निवेदन !

बार्शी येथील तहसीलदारांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी

बार्शी (जिल्हा सोलापूर) : येथे तहसीलदार श्री. ऋषिकेत शेळके आणि पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र मनसावले यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीची स्थापना करा या मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री नितीन जमदाडे, अमोल शाहीर, विजय थोरात, लक्ष्मण रामगुडे, राहुल परदेशी, महादेव जाधवर, वसंत डमरे आणि हिंदु जनजागृती समितीचे विक्रम घोडके उपस्थित होते.

माळशिरस

माळशिरस : येथील नायब तहसीलदार श्री. नामदेव काळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री महादेव तूपसौंदर, नाना चव्हाण, अनिल देशमुख, अनिल डहाळे आणि सौ. सुनीता दीक्षित आदी राष्ट्रप्रेमी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *