प्रतिदिन देशभरात सर्वत्र दिवसातून ५ वेळा मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवरून बांगदिली जाते, त्यांच्यावर असे निर्बंध आणण्यास पोलीस आणि शासन अद्याप का कचरते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : दहीहंडी उत्सवातील ध्वनीयंत्रणेवर पोलिसांकडून लादण्यात येणारे निर्बंध अवास्तव आहेत. विविध नियमांवर बोट ठेवून आमच्यावर गुन्हे प्रविष्ट करणार असल्याचे सातत्याने सांगितले जाते. वर्षभरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमात, तसेच जयंतीच्या मिरवणुकांमधील ध्वनीप्रदूषणाविषयी मौन बाळगले जाते. हिंदु सणांवरच निर्बंध का, असा प्रश्न उपस्थित करून पुणे शहर दहीहंडी उत्सव समितीने प्रशासनाचा निषेध केला. पालकमंत्री आणि पोलीस यांनी आमच्या मागण्यांवर विचार केला नाही, तर यंदा दहीहंडी फोडणार नाही, अशी चेतावणी विविध दहीहंडी मंडळांनी पत्रकार परिषदेत दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात