पोलीस निरीक्षक आणि व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यांच्याकडून तत्परतेने कृती
सावंतवाडी : येथील बाजारपेठेत फेरीवाल्यांकडून होणार्या प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि स्टीकर यांच्या विक्रीविषयी सनातनचे साधक अन् हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी पोलिसांना लक्षात आणून दिल्यावर ही विक्री थांबवण्यात आली.
येत्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने येथील बाजारपेठेत फेरीवाल्यांकडून प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि स्टीकर यांची विक्री होत असल्याचे सनातनचे साधक श्री. शंकर निकम यांच्या लक्षात आले. त्या वेळी त्यांनी विक्रेत्यांचे प्रबोधन केल्यावर फेरीवाल्यांनी तात्काळ हे ध्वज काढून ठेवले.
दुसर्या दिवशी सकाळी फेरीवाल्यांकडून प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि स्टीकर यांची विक्री पुन्हा चालू झाल्यानेे हिंदु जनजागृती समितीचे श्री. चंद्रकांत बिले आणि श्री. संतोष परब यांनी पोलीस ठाण्यातील निरीक्षक सुनील धनावडे यांना संपर्क करून लक्षात आणून दिले. त्यावर पोलीस निरीक्षक धनावडे यांनी तत्परतेने याविषयी सावंतवाडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. जगदीश मांजरेकर यांना कळवले. श्री. मांजरेकर यांनी तात्काळ बाजारपेठेत जाऊन फेरीवाल्यांना प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करण्यावर बंदी असल्याचे सांगून त्वरित साहित्य काढण्यास सांगितले. त्यानंतर फेरीवाल्यांनी हे साहित्य काढले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात