बँक ऑफ इंग्लंडने या संदर्भात लोकांचे मत मागविले असून त्यात ८८ टक्के लोकांनी बँकेच्या या निर्णयाविरोधात मत दिले असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. ब्रिटनमधील मंदिरांत या नोटांवर बंदी घालण्यात आली आहे.
बँक ऑफ इंग्लंडने काढलेल्या ५ पौंड आणि १० पौंडच्या नोटांमध्ये ही चरबी वापरण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर २०२० मध्ये येणाऱ्या २० पौंड किमतीच्या नोटेतही बीफ चरबीचा वापर करण्यात आला आहे. या नवीन पद्धतीने नोटा छापल्यास बँकेला १० वर्षांमध्ये १ कोटी ६५ लाख पौंड रक्कम खर्च करावी लागेल.
जनावरांची चरबी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, मोबाईल फोन, कॉस्मेटिक्स, साबण आणि घरगुती डिटर्जेंटमध्येही होतो, अशीही माहिती माध्यमांनी दिली आहे.
संदर्भ : माझा पेपर