Menu Close

महाराष्ट्रात ठिकठिकाणी रक्षाबंधन उत्साहात साजरे !

अमरावती

मी सदैव सनातन संस्थेच्या पाठीशी आहे ! – आमदार श्री. रवी राणा

आमदार श्री. रवी राणा, अमरावती

अमरावती  : सनातन संस्थेच्या वतीने आमदार श्री. रवी राणा यांना राखी बांधण्यात आली. त्या वेळी त्यांनी सनातन संस्थेचे कार्य उत्तम आहे. मी सदैव संस्थेच्या पाठीशी आहे, असे मत व्यक्त केले. अधिवक्ता प्रतिक पाटील यांनाही राखी बांधण्यात आली. त्यांना रणरागिणी शाखेच्या कार्याची माहिती दिली असतांना त्यांनी महिलांसाठी असे प्रामाणिक कार्य करणार्‍या संस्थेचे कौतुक केले आणि समाजात महिलांसाठी अशा कार्याची पुष्कळ आवश्यकता आहे, असे म्हटले. यापुढे मी हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या समवेत नेहमीच आहे, असे मत व्यक्त केले. आज माझी पहिलीच राखी असून ती अशा कार्याची आहे, याविषयी मला समाधान वाटते, असेही ते म्हणाले.

शिवसेनेचे माजी खासदार श्री. अनंत गुढे, शिवसेना शहरप्रमुख श्री. नरेंद्र केवले, हिंदुत्वनिष्ठ पत्रकार श्री. सूरज देवहाते या हिंदुत्वनिष्ठांना राखी बांधण्यात आली.

पुणे

श्री. राजेंद्र मुठे, निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे

येथील विभागीय आयुक्त श्री. चंद्रकांत दळवी यांना राखी बांधण्यात आली.

कोल्हापूर

रक्षाबंधनाच्या दिवशी कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. तानाजी सावंत यांना राखी बांधण्यात आली.

भांडुप

सत्य किरण टाइम्सचे पत्रकार श्री. मिहीर जोशी

सत्य किरण टाइम्सचे पत्रकार श्री. मिहीर जोशी यांनी सांगितले, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील लेख आमच्या पाक्षिकात प्रसिद्ध करीन. या वेळी त्यांनी देवद, पनवेल येथील सनातन आश्रम पहाण्याची इच्छा व्यक्त केली.

संभाजीनगर

संभाजीनगर महानगरपालिकेचे महापौर श्री. बापू घडामोडे

पेण

शिवसेनेचे पेण येथील शहरप्रमुख श्री. ओमकार दानवे
युवासेनेचे पेण येथील अध्यक्ष श्री.चेतन मोकल

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *