रोहा : येथील द.ग. तटकरे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, कोलाड या विद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. सुनील सावंत आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर्.बी. पालवे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ या विषयावर श्री. जगन्नाथ जांभळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शिक्षण अधिकारी श्री. सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी ते म्हणाले, ‘‘हिंदु धर्म अन्य धर्मांना सामावून घेणारा धर्म आहे. समिती करत असलेले कार्य उत्कृष्ट आहे. असे कार्य व्हायला हवे.’’ या प्रदर्शनाचा लाभ २ सहस्र विद्यार्थ्यांनी घेतला.
क्रांतीकारकांच्या चित्रांचा मुलांच्या मनावर चांगला परिणाम !
आम्हाला क्रांतिकारकांचे कार्य पहायला मिळाले. तुमचा प्रयत्न चांगला आहे. प्रदर्शनातील चित्रांचा मुलांच्या मनावर चांगला परिणाम होत आहे.
– सौ. सुचेता तटकरे, कोलाड
क्षणचित्र
सनातन संस्थेच्या ग्रंथांच्या बालसंस्कार मालिकेतील ७ ग्रंथ विद्यालयाने वाचनालयासाठी खरेदी केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात