Menu Close

राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी जिज्ञासू महिलांकडून प्रशासनाला निवेदन !

शिरोली पुलाची (जिल्हा कोल्हापूर) येथील धर्मशिक्षण वर्गातील जिज्ञासू महिलांचा स्तुत्य उपक्रम !

(मध्यभागी) शिरोलीच्या सरपंच सौ. जास्मिन गोलंदाज यांना निवेदन देतांना जिज्ञासू महिला
ज्ञानदीप विद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाविषयी मार्गदर्शन करतांना डावीकडे सौ. रूपाली खवरे

शिरोली पुलाची : ‘राष्ट्रध्वजाचा मान राखावा’, या मागणीचे निवेदन येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या येथील धर्मशिक्षणवर्गांतील जिज्ञासू महिलांनी शिरोलीच्या सरपंच सौ. जास्मिन गोलंदाज यांना दिले. तसेच ग्रामविकास अधिकारी श्री. ए.एच्. कटारे, राष्ट्रसेवा प्रशाला हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. एस्.बी चौगुले, शिरोली हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. बी.एस्. पाटील, कौतुक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सी.एस्. कुलकर्णी, महाडिक हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. बी.पी. पाटील आणि उर्दू प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, ज्ञानदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भोजे यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मशिक्षणवर्गातील जिज्ञासू महिला उपस्थित होत्या. (पुढाकार घेऊन राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयीचे निवेदन देणार्‍या धर्मशिक्षणवर्गातील महिलांचे अभिनंदन ! असा उपक्रम सर्व धर्मशिक्षण वर्गातील महिला आणि धर्मप्रेमी यांनी राबवला पाहिजे. – संपादक,दैनिक सनातन प्रभात)  

रांगोळीद्वारे विटंबना होत असल्याने राष्ट्रध्वज आणि नकाशा न काढण्याचा निर्णय !

प्रतिवर्षीच्या १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी शिरोली गावातील महिला आणि शाळा यांच्या वतीने गल्लीतील रस्त्यांवर आणि शाळांमध्ये भारताचा नकाशा आणि राष्ट्रध्वज रांगोळीद्वारे काढण्यात येत असे; मात्र अशी रांगोळी काढल्यानंतर काही वेळानंतर ती रांगोळी पायदळी तुडवून राष्ट्रध्वज आणि नकाशा यांची विटंबना होते. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिनापासून शिरोली गावात अशा पद्धतीने रांगोळी काढू नये, असे शिरोली गावातील दुसर्‍या धर्मशिक्षणवर्गातील जिज्ञासू महिलांनी गावातील महिला आणि शाळांचे मुख्याध्यापक अन् शिक्षक यांचे प्र्रबोधन केले. या वेळी गावातील महिला आणि शिक्षक यांनी ‘अशी रांगोळी काढून राष्ट्रध्वज आणि नकाशा यांची विटंबना करणार नाही’, असे जिज्ञासू महिलांना सांगितले.


‘हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम स्तुत्य आहे. मी परिपत्रक काढून शिरोली गावातील सर्व शाळा आणि संस्था यांना पाठवून देईन. मी तुमच्या पाठीशी असून तुमच्या सर्व कार्यक्रमांना सहकार्य करून सहभागी होईन.’

– श्री. ए.एच्. कटारे, ग्रामविकास अधिकारी, शिरोली पुलाची

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *