तासगाव (जिल्हा सांगली) : हिंदु जनजागृती समिती प्रबोधन करत असलेल्या ‘शास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे विसर्जन हे वहात्या पाण्यातच होणे आवश्यक आहे’, या मताशी मी सहमत असून तसे होण्यासाठी आपण शहरात पुढाकार घेऊ, असे आश्वासन तासगावचे नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांनी दिले. डॉ. विजय सावंत यांनी तात्काळ या विषयाच्या संदर्भात तहसीलदारांशीही चर्चा करून कृत्रिम हौद न ठेवण्याच्या संदर्भात सूचनाही केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सवाच्या संदर्भात त्यांना निवेदन दिले असता ते बोलत होते. (शास्त्र लक्षात घेऊन श्री गणेशमूर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यातच करण्यासाठी पुढाकार घेणारे नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांचे अभिनंदन ! इतरत्रच्या लोकप्रतिनिधींही याचप्रकारे पुढाकार घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हेच निवेदन तहसीलदार श्री. सुधाकर भोसले यांनाही देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री गोविंद सोवनी, सचिन कुलकर्णी, दत्तात्रय ऐडके, विलास पोळ उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात