शिक्षक आणि विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी प्राणांची पर्वा न करता जुलमी इंग्रजी सत्तेच्या विरोधात लढा दिला. क्रांतिकारकांच्या क्रांतीगाथेचा इतिहास पाठ्यपुस्तकांमधून अपेक्षित प्रमाणात सांगितला जात नाही. क्रांतीकारकांचे हे क्रांतीकार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे आणि त्यांनाही देशसेवा करण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने सनातन संस्था पुणे न्यासाच्या वतीने १० ऑगस्ट या दिवशी चंदननगर-खराडी भागातील सारथी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयामध्ये क्रांतीकारकांचे सचित्र फलक प्रदर्शन लावण्यात आले होते. १ सहस्र ११४ विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहिले. अनेक विद्यार्थ्यांनी वहीमध्ये माहिती लिहून घेतली. शिक्षकांनीही प्रदर्शन चांगले असल्याचे सांगितले. शाळेतील विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी फलक प्रदर्शन लावण्यासाठी आणि काढण्यासाठी साहाय्य केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात