पुण्याचे वैशिष्ट्य असणार्या गणेशोत्सवाची शान आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या बोधचिन्हातून श्री गणेशाचे विकृत रूप दाखवण्याऐवजी मूर्तीशास्त्रानुसार योग्य रूपातील गणेशमूर्ती घेतली असती, त्याची खर्या अर्थाने प्रसिद्धी झाली असती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : येथील गणेशोत्सवाच्या यंदाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रम, बोधचिन्ह, ध्वज, संकल्पनेचे गाणे (थीम साँग), भ्रमणभाष अॅप शुभंकर यांचे १२ ऑगस्ट या दिवशी शनिवारवाड्याच्या पटांगणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बोधचिन्हामध्ये (लोगो) श्री गणेशाची सोंड आणि कान एवढेच चित्र घेतले आहे, तर शुभंकर या भ्रमणभाष अॅपसाठी सिद्ध केलेल्या चित्रामध्ये कार्टूनच्या वेशातील श्री गणेशाचे चित्र आहे. (देवतेचे चित्र मूळ स्वरूपात रेखाटले, तरच त्यातून श्री गणेशतत्त्वाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. श्री गणेश म्हणजे आपली कला सादर करण्याचे माध्यम नव्हे. विडंबनात्मक चित्रांऐवजी महानगरपालिकेने सात्त्विक चित्रे वापरली असती, तर श्री गणेशाची कृपा झाली असती. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात