-
हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ
-
नवी मुंबईच्या महापौरांना निवेदन
नवी मुंबई : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांना राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी निवेदन देण्यात आले. या वेळी महापौर म्हणाले, समितीच्या चळवळीमुळे समाजात जागृती होत आहे. समितीकडून निवेदन आल्यावर राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी आवाहन करणारी विज्ञापने आम्ही अन्य वृत्तपत्रांना प्रतिवर्षी देतो. यावर्षीसुद्धा पुढील २-३ दिवसांत या आशयाची विज्ञापने वृत्तपत्रांमध्ये आपणास पहायला मिळतील. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी, हिंदू राष्ट्र सेनेचे श्री. भालचंद्र गायकवाड, धर्मप्रेमी सर्वश्री पंकज आंबेरकर आणि वैभव साळुंखे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
नाशिक येथे नगराध्यक्ष, निवासी उपजिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना निवेदन !
नाशिक : राष्ट्रध्वजाचा मान राखा या मोहिमेअंतर्गत कोपरगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नगराध्यक्ष श्री. विजय वहाडणे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. रामदास खेडकर आणि पोलीस आयुक्त श्री. रवींद्र सिंघल यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. किर्तीराज घुगे आणि मालेगाव येथून आलेले श्री. संदीप वाघ, श्री. संतोष वाघ हे राष्ट्रप्रेमी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी म्हणाले, तुमचे कार्य अगदी शांततेच्या पद्धतीने आणि संयमित आहे. मी नाशिक महानगरपालिकेला राष्ट्रध्वजाच्या संदर्भात पत्र लिहून तुमच्या भावना अवश्य कळवीन.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात