हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा चळवळ !
विटा (सांगली जिल्हा) : राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी विटा येथील सौ. इंदिराबाई भिडे कन्या शाळा, सौ. लिलाताई देशचौगुले प्राथमिक विद्यामंदिर, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यापक महाविद्यालय, रमाबाई रानडे माध्यमिक विद्यालय, क्रांतीसिंह विद्यालय या शाळांमध्ये निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु धर्मसेनेचे सर्वश्री शिवभैय्या शिंदे, अमोल पवार, शुभम देसाई आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल कदम उपस्थित होते. या सर्व शाळांनी विद्यार्थ्यांपर्यंत विषय पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
समितीचे सर्व उपक्रम चांगले असल्याने आवर्जून विद्यार्थ्यांपर्यंत पाहोचवतो ! – मुख्याध्यापक
जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) : येथील झेले हायस्कूल येथे मुख्याध्यापक श्री. कर्मवीर बिरनाळे, समिती सदस्य श्री. गजकुमार माणगावे, शिक्षक श्री. बाहुबली रई उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. बिरनाळे यांनी ‘समितीचे सर्व उपक्रम चांगले असल्याने आम्ही आवर्जून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात क्रांतीकारकांचे प्रदर्शन लावू’, असे सांगितले. शिरोळ येथील पद्याराजे विद्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक श्री. रंगराव जाधव, उपमुख्याध्यापक श्री. टी.ए. लाड, पर्यवेक्षक सी.डी. कदम, शिक्षिका सौ. शशिकला संभाजी पाटील, हिंदु जनजागृती समितीच्या अधिवक्त्या (सौ.) मनीषा माने उपस्थित होत्या.
सोलापूर आणि पंढपूर येथे विविध शाळांमधून प्रबोधन !
सोलापूर
१. येथील हरीभाई देवकरण प्रशालेच्या शतक महोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. दत्तात्रय पिसे यांनी राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर विद्यार्थ्यांना अवगत केले. या वेळी २ सहस्त्र ४०० विद्यार्थी आणि ६० शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर समितीचे श्री. पिसे आणि श्री. सचिन देवडीकर यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अनिल उंबरजे यांनी केला.
क्षणचित्रे
अ. समितीने मांडलेला विषय आवडल्याने प्रशालेने आभार मानले. तसेच ‘पुन्हा समितीचा कार्यक्रम घेऊ’, असे सांगितले.
आ. विषय आवडल्याने प्रशालेने संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण केले.
इ. मुलांवर संस्कार करणार्या ५० सनातन निर्मित सात्त्विक ग्रंथांची मागणी शाळेसाठी केली.
२. जुळे सोलापूर येथील मेहता प्रशाला येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. दत्तात्रय पिसे यांनी राष्ट्रध्वजाचे महत्त्व हा विषय मांडला. या वेळी १ सहस्त्र विद्यार्थी आणि १८ शिक्षक उपस्थित होते.
३. येथील सोनामाता आदर्श कन्या प्रशाला येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सौ. राजश्री देशमुख यांनी राष्ट्रध्वजाचा मान राखणे, प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व, क्रांतीकारकांचा इतिहास, स्वदेशी वस्तूंचा वापर या विषयांवर विद्यार्थिनींना अवगत केले. या वेळी ४०० विद्यार्थीनी आणि २२ शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांसह सर्वांनाच विषय आवडला. ‘असेच विषय मांडण्यासाठी पुन्हा या’, असे प्रशालेने सांगितले.
४. निर्मलनगर येथील मुरारजी पेठेतील विमल कन्या प्रशाला येथे सौ. राजश्री देशमुख यांनी विषय मांडला. या वेळी १६० मुली उपस्थित होत्या.
पंढरपूर
येथील मातोश्री सखुबाई कन्या प्रशाला येथे राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर सौ. सुवर्णा पेठकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ३५० विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात