- पाकच्या एखाद-दुसर्या पत्रकाराला तेथील हिंदूंच्या दयनीय स्थितीची माहिती द्यावीशी वाटते, भारतातही हीच स्थिती आहे !
- भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्याविना पाक आणि जगभरातील हिंदूंचे रक्षण होऊ शकणार नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
इस्लामाबाद : पाकमध्ये मंदिरे आणि गुरुद्वारे यांची स्थिती चांगली नाही. पाकमधील कट्टरतावादी नेहमी मंदिरे आणि गुरुद्वारे यांना लक्ष्य करतात. अनेक महत्त्वाची मंदिरे आणि गुरुद्वारे पाडली जातात. या संदर्भात पाकमधील पत्रकार राऊफ क्लासरा यांनी एका चित्रफितीद्वारे याची माहिती दिली आहे.
यात क्लासरा यांनी म्हटले आहे की, येथे हिंदू आणि यांची भूमी आणि गुरुद्वारे यांची विक्री करण्यात आली. पाकचे सरकार शिखांची गुरुद्वारे विकत आहे यावरून भारतीय संसदेमध्ये गोंधळही झाला. यानंतर याविषयावर भारत सरकारने पाकशी चर्चा केली. आम्ही जर त्यांना सुरक्षित ठेवू शकत नाही, तर भारताला त्याचा विरोध करण्याचा अधिकार आहे. लरकाना येथे हिंदूंची मंदिरे जाळण्यात आली. आमच्या मुलींचा बळजोरीने विवाह केला जातो, याविषयी हिंदू तक्रार करतात; मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाही. सिंधमध्ये होणार्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात