Menu Close

तुळजापूर येथे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी राष्ट्राभिमान्यांचे घोषणा देऊन प्रबोधन !

घोषणा देतांना राष्ट्राभिमानी नागरिक

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) : भारतियांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून राष्ट्रकर्तव्य पार पाडायला हवे. यासाठी सर्वांनीच आंदोलनात सहभागी होऊया, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक श्री. श्रीकांत पाठक यांनी केले. १२ ऑगस्ट या दिवशी येथे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घोषणा देऊन प्रबोधन केले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राष्ट्राभिमान्यांनी ‘यापुढे गणेशोत्सव, दिवाळी  या कालावधीत चिनी वस्तू खरेदी करणार नाही आणि इतरांनीही खरेदी करू नये, यासाठी प्रबोधन करणार’, असा निर्धार केला आहे.

या वेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष समाधान परमेश्‍वर (महाराज), शिवबाराजे संघटनेचे अर्जुन साळुंके, विकी वाघमारे, जाणता राजा युवा मंचचे सुदर्शन वाघमारे, बारुळ येथील विश्‍वजीत पाटील, सागर ठोंबरे, भाजपचे गुलचंद व्यवहारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शैलेश पोतदार, हिंदु जनजागृती समितीचे अमित कदम, विलास पुजारी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *