Menu Close

संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी लक्ष्मणपुरी मधील एका भाजी मंडईत संस्कृत भाषेचा वापर !

संस्कृतच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार्‍याया भाजी मंडईतील भाजी विक्रेत्यांचे अभिनंदन !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : येथील नशितगंजमधील एका भाजीमंडईमध्ये संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी विक्रेत्यांकडून संस्कृत भाषेचा वापर केला जातो. येथे सर्व भाज्यांच्या संस्कृत नावांचा फलकही लावण्यात आला आहे. ‘संस्कृतच आमची प्रमुख भाषा आहे. सरकार संस्कृतसंदर्भात पक्षपात करून त्याकडे दुर्लक्ष करत आहे’, असे तेथील एका भाजी विक्रत्याने सांगितले.

ज्या लोकांना संस्कृत येत नाही, त्यांना कसे समजेल ? याविषयी विक्रेत्यांनी सांगितले की, त्यांना ही भाषा समजावी, यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. या बाजारात प्रतिदिन भाजी विकत घेणारे भाजीचे मूल्य संस्कृतमध्येच विचारतात आणि खरेदी करतात.  या मंडईमधील एका महिला भाजी विक्रेतीने म्हटले आहे की, माझ्यासारखे अल्पशिक्षित जर संस्कृत भाषा समजू शकतात, तर बुद्धीमान लोक ही भाषा सहजतेने समजू शकतील.

‘आपली भाषा वाचवण्याचा हाच एक प्रयत्न आहे. माझी पत्नी आणि दोन मुलेही घरामध्ये संस्कृतमध्ये बोलतात. सर्वसामान्य लोकांना संस्कृत समजावी, यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत’, असे उत्तरप्रदेश संस्कृत संस्थानचे प्रशासकीय अधिकारी जगदानंद झा यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *