नागपूर : येथील हडस हायस्कूलमध्ये १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थी आणि पालक यांच्या प्रबोधनासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी समितीचे श्री. अतुल आर्वेन्ला यांनी मार्गदर्शन केले. तेथे क्रांतिकारकांच्या चित्रांचे प्रबोधन फलकही लावण्यात आले होते. या कार्यक्रमाचा ६०० ते ७०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. समितीचे कार्य पाहून शिक्षकवृंद प्रभावित झाला. ‘लवकरच समितीला परत बोलावू आणि अजून एक भव्य प्रबोधनाचा कार्यक्रम घेऊ’, असे आयोजक शिक्षक डॉ. वंजारी यांनी सांगितले.
या वेळी समितीचे उपक्रम पाहून प्रभावित झालेल्या प्राचार्या सौ. कुंडले आणि शिक्षकवृंदांनी समितीला विशेष अतिथी म्हणून निमंत्रण दिले होते. प्राचार्या म्हणाल्या, ‘‘समितीचे काही कार्यकर्ते वयोवृद्ध असूनही त्यांच्यातील राष्ट्राभिमान पाहून आनंद झाला.’’ लवकरच या शाळेत ‘सनातन प्रभात’चा अंक चालू करण्यात येणार आहे. समितीच्या कार्यकर्त्यांचा या वेळी व्यासपिठावर सत्कार करण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात