कोल्हापूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी
कोल्हापूर : चीनच्या हेकेखोरपणाला उत्तर देण्यासाठी नागपूर ‘मेट्रो’च्या डब्यांचे चिनी आस्थापनाला दिलेले कंत्राट तात्काळ रहित करावे आणि चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालावा, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ‘बॉडीस्केप्स’ या चित्रपटावर त्वरित बंदी घालावी, केरळ आणि तमिळनाडू येथे हिंदू नेत्यांवर आक्रमण करणार्यांच्या विरोधात केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने १३ ऑगस्टला दुपारी १२ वाजता येथील छत्रपती शिवाजी चौक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. वरील मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठांनी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनाला ६० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री. संभाजी भोकरे, करवीर तालुका प्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे श्री. किशोर घाडगे, धर्मप्रेमी श्री. गोविंदराव देशपांडे, विहिंपचे शहराध्यक्ष श्री. अशोक रामचंदानी, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, छावा मर्दानी आखाड्याचे श्री. चंद्रकांत पवार, सनातन संस्थेचे आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे आदी उपस्थित होते.
मान्यवरांचे मनोगत
१. श्री. राजू यादव : आजपर्यंत हिंदु जनजागृती समितीने देवतांची चित्रे असणार्या फटाक्यांची विक्री थांबवणे, प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री थांबवणे, अशी जी आंदोलने हाती घेतले आहे, त्याला यश मिळतांना दिसत आहे. त्यामुळे आम्ही सतत समितीच्या आंदोलनात सहभागी असतो आणि रहाणार आहे.
२. श्री. अशोक रामचंदानी : सध्या केरळ, तमिळनाडू येथे हिंदु नेत्यांच्या ज्या हत्या होत आहेत, ते अतिशय दुर्दैवी आहे. या संदर्भात केंद्र सरकारने याची तात्काळ नोंद घ्यावी, अन्यथा सर्वसामान्य हिंदू रस्त्यावर उतरतील.
३. श्री. संभाजी भोकरे : देशामध्ये सर्वसामान्य नागरिक चीनच्या उत्पादनावर बहिष्कार घालत असतांना सरकार चिनी आस्थापनाला ८२५ कोटी रुपयाचे कंत्राट देत आहेत. हे अत्यंत अयोग्य आहे. या संदर्भात सरकारने तात्काळ नोंद घेऊन हे कंत्राट रहित करावे.
वैशिष्ट्यपूर्ण घटना
१. पेठ वडगावमधील २ महिला स्वतःहून आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
२. रस्त्यावरून जाणारे लोक राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला नमस्कार करून पुढे जात होते.
३. आंदोलनाला कोल्हापूर जिल्ह्यातील शिये, केर्ले, टोप या गावांमधील धर्मप्रेमी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात