Menu Close

माझगाव (मुंबई) येथील प्रिंस अलीखान रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रध्वज तिरका फडकावल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान

हिंदु जनजागृती समितीचे प्रसाद मानकर यांची पोलीस ठाण्यात तक्रार

मुंबई : स्वातंत्र्यदिनी माझगाव येथील प्रिंस अलीखान रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रध्वज तिरका फडकावल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान झाला. याविषयी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. प्रसाद मानकर यांनी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या वेळी श्री. मानकर यांच्यासमवेत हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. सुमित सागवेकर उपस्थित होते.

या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिंगटे यांनी तातडीने घटनास्थळी पोलिसांना पाठवून पुढील कारवाईचे आदेश दिले. या वेळी श्री. प्रसाद मानकर यांना पोलीस निरीक्षक तुरे, उपनिरीक्षक स्वप्नील पाटील यांनी पुढील कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *