Menu Close

मध्यप्रदेशातील भोजशाळेला पोलीस छावणीचे स्वरूप !

  • हिंदु भाविकांची मागणी दडपण्याचा शासनाचा प्रयत्न !

  • हिंदु राष्ट्रातच हिंदूंना खर्‍या अर्थाने न्याय मिळेल !

नवी देहली/भोपाळ : मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात असणार्‍या भोजशाळेत आज शुक्रवार, १२ फेब्रुवारीला वसंतपंचमीच्या निमित्ताने सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला आहे. या परिसराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

१. येथे दुपारी १ ते ३ या कालावधीत मुसलमानांना नमाज पढण्यास प्रशासनाने दिलेल्या अनुमतीचा हिंदूंकडून आणि त्यांच्या संघटनांकडून विरोध केला जात आहे. हिंदूंची मागणी आहे की, त्यांना संपूर्ण दिवस पूजा करण्याची अनुमती मिळाली पाहिजे.

२. येथे मुसलमानांनी नमाज पढण्याचा प्रयत्न केला, तर हिंदू भोजशाळेत जाऊन पूजा न करता बाहेरच पूजा करतील, अशी चेतावणी धर्मजागरण मंचकडून देण्यात आली आहे. (हिंदूंनी स्वतः भोजशाळेबाहेर पूजा करणे दुर्दैवी ! हिंदूंनो, धर्मांधांना भोजशाळेतून बाहेर काढण्यासाठी शिकस्त करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. मागच्या शुक्रवारी मुसलमानांनी नमाजाच्या वेळी सहस्रोंच्या संख्येने गर्दी केली होती. ते मुसलमानांचे शक्तीप्रदर्शन होते. उद्याही त्यांच्याकडून अशीच उपस्थिती रहाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

४. या पार्श्‍वभूमीवर येथे प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

५. वर्ष २०१३ मध्येही वसंतपंचमी शुक्रवारी आल्यानंतर अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी येथे पोलिसांकडून नमाजपठणाला विरोध करणार्‍या हिंदूंवर लाठीमार करण्यात आला होता. त्यात अनेक जण घायाळ झाले होते.

६. इंदूर विभागाचे आयुक्त संजय दुबे यांनी म्हटले की, आम्ही पुरातत्व खात्याच्या आदेशाचे पालन करत हिंदू आणि मुसलमान यांना निश्‍चित करण्यात आलेल्या वेळांमध्ये त्यांच्या धार्मिक परंपरांचे पालन करण्यास देऊ.

७. भारतीय प्रशासकीय सेवेतील एका ज्येष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, आम्हाला शासनाचे आदेश असल्याने त्याचे पालन करण्याव्यतिरिक्त आमच्याकडे कोणताही पर्याय नाही.

भोजशाळेमध्ये नमाज पढण्याच्या विरोधात मुसलमानांकडून दोन याचिका दाखल

इंदूर : भोजशाळेमध्ये नमाज पढण्यात येऊ नये, यासाठी ऑल इंडिया राष्ट्रवादी मुस्लिम आंदोलनचे सदस्य जाकिर गौरी आणि मुस्लिम पर्सनल बोर्डचे सदस्य आरिफ महंमद यांनी उच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. यात याचिकाकर्त्यांनी भोजशाळेत नमाज पढण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. जाकिर गौरी यांच्या मते, कुराण शरीफच्या हदीस अणि सूरा यांमध्ये नमाज कुठे पढण्यात येऊ नये, याविषयी उल्लेख आहे. त्यामुळे भोजशाळेच्या बाहेर असलेल्या मशिदीमध्ये नमाज केला पाहिजे. (कुराण शरीफचा हवा तसा अर्थ काढून हिंदूंना त्रास द्यायचा हाच उद्देश असल्यामुळे धर्मांध मुद्दामहून भोजशाळेत नमाज पढतात, असेच यातून लक्षात येते. राजकारण्यांनाही या सूत्राचा सोक्षमोक्ष न लावता तो चिघळत ठेवून मतांचे राजकारण करायचे असते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

(म्हणे) भोजशाळेत मूर्तीच नाही, तर कोणाची पूजा करता ?

भोजशाळा हिंदूंचे मंदिर आहे, हे या प्रश्‍नातून दिग्विजय सिंह मान्य करत आहेत, हेही नसे थोडके !

स्वतःला हिंदु म्हणवणारे काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांना असा प्रश्‍न करतांना लाज कशी वाटत नाही ?

जर भोजशाळेत कोणतीही मूर्ती नाही, तर विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते कोणाची पूजा करण्यासाठी तेथे जातात, असा प्रश्‍न काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. (देशात सर्वाधिक काळ सत्तेवर असणार्‍या काँग्रेसने लंडनच्या संग्रहालयात असलेली भोजशाळेतील सरस्वतीदेवीची मूर्ती आणण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत, हे दिग्विजय सिंह का सांगत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *