मुसलमानांना गरब्यामध्ये प्रवेश मिळू नये, यासाठी भोपाळ येथील हिंदु उत्सव समितीची मागणी
धर्मांध हे हिंदूंच्या अन्य उत्सवांमध्ये कधी सहभागी होत नाहीत. होळीच्या वेळी गुलाल अंगावर उडाल्यास त्याचा विरोध करतात, मशिदीसमोरून हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका नेतांना वाद्य वाजवणे बंद करण्यास सांगतात, नमाजाच्या वेळी ध्वनीक्षेपकावर आरती चालू असल्यास ती बंद करण्यास भाग पाडतात, ते धर्मांध ओळख लपवून लव्ह जिहादसाठी हिंदूंच्या धार्मिक उत्सव असणार्या गरब्यामध्ये सहभागी होतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
भोपाळ : नवरात्रोत्सवातील गरब्यामध्ये केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा. त्यासाठी आधारकार्ड बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी हिंदु उत्सव समितीने येथे केली आहे. भोपाळमध्ये जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या शांतता समितीच्या बैठकीत समितीने ही मागणी केली आहे. या मागणीनंतर जिल्हा प्रशासनाने कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. मुसलमानांना गरब्यामध्ये प्रवेश मिळू नये, यासाठी समितीने ही मागणी केल्याचे समितीचे अध्यक्ष कैलाश बेगवानी यांनी स्पष्ट केले. समितीचे जवळपास ६ सहस्र सदस्य आहेत.
१. बेगवानी म्हणाले की, निवडणूक ओळखपत्र किंवा अन्य कागदपत्रांप्रमाणे बनावट आधारकार्ड बनवणे सोपे नाही. गरब्यामध्ये प्रवेशाच्या वेळी आधारकार्ड दाखवले, तर त्या व्यक्तीच्या ओळखीविषयी कोणतीही शंका उपस्थित होणार नाही.
२. उत्सवानंतर हिंदु मुलींचे इतर धर्मांतील लोकांकडून शोषण झाल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी आल्या आहेत. गैरहिंदु लोक उत्सवामध्ये हिंदु मुलींशी मैत्री करतात. त्यांना फूस लावतात, असेही बेगवानी यांनी सांगितले.
३. या बैठकीत समितीकडून आणखी काही मागण्या करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवात मांस विक्री आणि दारूची दुकाने बंद ठेवण्यात यावीत, या मागण्यांचे निवेदनही समितीने जिल्हा प्रशासनाला दिले आहे. ‘अवैध मांस वाहतूक करणार्यांच्या विरोधातही कडक कारवाई करण्यात यावी’, अशी मागणीही करण्यात आली आहे. ‘श्री गणेशमूर्तीची उंची ९ फुटांपेक्षा अधिक नको’, अशी मागणीही केली होती; पण नियोजन समितीने ती फेटाळली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात