कराड : पुण्यातील पुरोगामी विचारवंत प्रा. ग.प्र. प्रधान यांनी त्यांच्या वसुधा मनोविकास प्रतिष्ठानची सर्व मालमत्ता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ट्रस्टमध्ये विलीन केली होती. खुद्द डॉ. दाभोलकर यांनी तसा जबाब स्वतःच्या स्वाक्षरीने वर्ष २०१२ मध्ये दिला आहे. प्रत्यक्षात ती सर्व मालमत्ता अंनिसच्या ट्रस्टने कुठेच दाखवलेली नाही. यानंतर ५ वर्षांनी म्हणजे वर्ष २०१७ मध्ये शैला दाभोलकर याविषयी जबाब देतात की, विलीनीकरणाचा ठराव झाला होता; पण त्या ट्रस्टने पुढाकार न घेतल्याने ती प्रक्रिया पूर्ण झाली नाही. या घोटाळ्याविषयी १८ ऑगस्टला हमीद दाभोलकरांना एका वृत्तवाहिनीने प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की, ग.प्र. प्रधान यांचा ट्रस्ट साधना ट्रस्टमध्ये विलीन झाला आहे. या सर्व प्रकारात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्वतःच्या जबाबात एक सांगितले, शैला दाभोलकर त्यांच्या जबाबात दुसरेच सांगतात आणि हमीद दाभोलकर पत्रकारांना तिसरेच सांगतात.
हे नक्की काय गौडबंगाल आहे ? यामध्ये डॉ. दाभोलकर किंवा शैला दाभोलकर किंवा हमीद दाभोलकर यांपैकी कोण खोटे बोलत आहे, हे जनतेसमोर यायलाच हवे. याचसमवेत प्रा. ग.प्र. प्रधान यांच्या किती मालमत्ता होत्या, त्या त्यांनी कोणाकोणाला दान केल्या आणि साधना ट्रस्टला दिलेली मालमत्ता यांविषयीचे सर्व पुरावे पत्रकारांसमोर उघड करावेत, अशी मागणी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. या वेळी हिंदु एकता आंदोलनचे श्री. विनायक पावसकर, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सागर आमले आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनावणे हेही उपस्थित होते.
श्री. वर्तक यांनी उपस्थित केलेले अंनिसवाल्यांकडे जवाब दोचे आवाहन करणारे प्रश्न . . .
१. विवेकवादाचा बुरखा पांघरणारे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासकामी दबाव निर्माण करण्यासाठी राज्यभर जवाब दोची दवंडी पिटणारे अंनिसवाले त्यांच्या ट्रस्टने केलेल्या घोटाळ्यांविषयी मात्र गप्प आहेत. वरील मालमत्ता अंनिसच्या ट्रस्टमध्ये न दाखवता कोणाच्या घशात गेली ?
२. अशा प्रकारे अंनिसला दान केलेली आणि कुठेही न दाखवलेली मालमत्ता गिळंकृत करणार्यांच्या वादातून तर डॉ. दाभोलकरांची हत्या झाली नाही ना ?
३. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येतील पिस्तुल ज्यांच्याकडे सापडले, त्या खंडेलवाल-नागोरी यांना शिक्षा व्हावी, यासाठी अंनिस का प्रयत्न करत नाही ? खरे खूनी सापडावेत, ही इच्छा आहे कि सनातनच्या साधकांना त्रास व्हावा हा हेतू आहे ? (अंनिसवाल्यांनो, या प्रश्नांची उत्तरे (जवाब) द्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
डॉ. दाभोलकर यांची हत्या आर्थिक घोटाळ्यातून झाल्याची शक्यता ! – श्री. विनायक पावसकर
श्री. विनायक पावसकर म्हणाले, अन्वेषण यंत्रणा खटला लवकर का चालू करत नाहीत ? सनातनच्या साधकांच्या विरोधात यंत्रणांकडे कोणतेही पुरावे नाहीत. डॉ. दाभोलकर यांची हत्या आर्थिक घोटाळ्यातून झाल्याची शक्यता आहे. संपूर्ण भारतात हिंदुत्वनिष्ठांना त्रास देणे चालू आहे. सनातन संस्था ही संविधानाने दिलेल्या अधिकारानुसारच कार्य करते.
श्री. सागर आमले म्हणाले, अंनिसने समाजातून घेतलेल्या पैशांचा गैरव्यवहार हा देशद्रोहाचाच गुन्हा ठरतो. याविषयी पत्रकारांनी आवाज उठवायला हवा. सनातनच्या मागे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना उभ्या आहेत. – श्री. सागर आमले
क्षणचित्र
या पत्रकार परिषदेचे फेसबूकवरून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात