राऊरकेला (ओडिशा) : स्वार्थी राज्यकर्ते आणि त्यांनी अवलंबलेले ‘मतपेढी’चेे राजकारण यांमुळे भारताचा सर्वनाश झाला आहे. त्यामुळे आपल्याला समाजामध्ये धर्मजागृती करून हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सुंदरगड जिल्ह्यातील हाथीवाडी येथील आयोजित प्रवचनात केले. सद्गुरु डॉ. पिंगळे पुढे म्हणाले,
१. गेल्या ७० वर्षांत हिंदु धर्मावर आणि धर्मियांवर अनेक आघात झाले. गांवागावांत रस्ते, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधा दिल्या गेल्या नाहीत. त्यामुळे ख्रिस्ती मिशनर्यांनी त्यांना विदेशातून मिळणार्या कोट्यवधी पैशांच्या आधारे या मुलभूत गरजांच्या माध्यमातून ग्रामीण आणि आदिवासी लोकांची फसवणूक करून प्रचंड प्रमाणात धर्मांतर केले.
२. देशाच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये इंग्रजांच्या काळात एकही ख्रिस्ती नव्हता, तेथे आज ९० टक्क्यांहून अधिक संख्या ख्रिस्त्यांची आहे. आज ख्रिस्ती त्यांच्या शाळेत त्यांच्या धर्माचे शिक्षण देऊ शकतात. मदरशांमध्ये इस्लामचे शिक्षण दिले जाऊ शकते; परंतु जेथे जवळ जवळ सर्वजण हिंदू आहेत, तेथे हिंदु धर्माचे शिक्षण द्यायला बंदी आहे.
३. चर्च, मशिदी यांच्यावर आज कसलेही कर नाहीत. हिंदु मंदिरे, यात्रा यांवर टॅक्स आहेत. पुरी, बालाजी, शिर्डी, पद्मनाभ अशा अनेक मंदिरांतील संपत्ती आज शासन हडप करत आहे. या संपत्तीमधून धर्मशिक्षणाची व्यवस्था केली जात नाही.
४. जर आम्हाला आमचा परिवार वाचवायचा असेल, आपल्या गांवाचे, धर्माचे आणि राष्ट्राचेे रक्षण करायचे असेल, तर आम्हाला धर्मशिक्षण घ्यावे लागेल अन् साधना करावी लागेल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात