पारगाव (जिल्हा कोल्हापूर) : येथील धर्मप्रेमींनी श्रावणी सोमवारचे औचित्य साधून हिंदूंना ‘हिंदु धर्माचे महत्त्व, हिंदु धर्माच्या सद्यस्थितीवरील उपाय आणि धर्मरक्षण’ या संदर्भात माहिती होण्यासाठी १४ ऑगस्टला येथे सभेचे आयोजन केले होते. हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी उपस्थितांना धर्मावरील आघातांच्या संदर्भात मार्गदर्शन करून धर्मरक्षणासाठी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी कोल्हापूर येथील हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. किरण दुसे यांनी ‘धर्मशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. सभेला २०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
सभेचे आयोजन धर्मप्रेमी श्री. महेश सुतार यांनी केले, तसेच धर्मप्रेमी सर्वश्री सूरज पाटील, स्वरूप पाटील, सुहास पाटील, नेताजी पाटील, अभिजित मोहिते, शुभम निकम, निवास पाटील, संतोष पाटील, विजय लोखंडे, डॉ. राहुल मोरे यांनी सभेच्या आयोजनात सहकार्य केले. या सभेत श्री. मनोज खाडये यांचा सत्कार हातकणंगले पंचायत समितीचे सदस्य श्री. शिवाजी सिदयू यांनी, तर उद्योगपती आणि स्थापत्य अभियंता श्री. आनंद पाटील यांचा सत्कार डॉ. राहुल मोरे, तसेच श्री. किरण दुसे यांचा सत्कार स्थापत्य अभियंता श्री. किशोर पाटील यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
क्षणचित्रे
१. सभेच्या ठिकाणी लावलेल्या सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
२. स्थानिक तरुणांनी समाजातून अर्पण गोळा करून सभेनंतर महाप्रसादाची व्यवस्था केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात