बकरी ईदला बरेच दिवस बाकी असतांना महापालिका त्यांच्यासाठी ‘बकरी अॅप’ सिद्ध करते आणि हिंदूंना मंडप बांधायलाही अनुमती देत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : गणेशोत्सव ८ दिवसांवर येऊनही येथील अनेक गणेशोत्सव मंडळांना महापालिकेकडून अद्याप मंडपांसाठी अनुमती मिळालेली नाही. १६ ऑगस्टपर्यंत केवळ १७ मंडळांनाच अनुमती देण्यात आली, तर ६० गणेशोत्सव मंडळांना विविध कारणांसाठी अनुमती नाकारण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी महापालिकेची अनुमती घ्यावी लागत असून १६ ऑगस्टपर्यंत महापालिकेकडे एकूण ७३८ गणेशोत्सव मंडळांचे अर्ज प्रविष्ट झाले आहेत. मंडपांच्या अनुमतीसाठी आलेले अर्ज प्रारंभी स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस यांचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळावे यासाठी पाठवले जातात. त्यानंतरच अनुमती दिली जाते. मुंबईत गणेशमूर्ती बनवणे आणि विक्री करणे यासाठी २८६ मूर्तीकारांनी मंडपांसाठी अर्ज केला होते. त्यातील १०४ मूर्तिकारांच्या मंडपांना अनुमती देण्यात आली, तर ९३ मूर्तिकारांना अनुमती नाकारण्यात आल्याचे समजते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात