Menu Close

गणेशोत्सव मंडळांमध्ये चिनी वस्तूंची खरेदी करू नका, असे प्रबोधन करणारे फलक लावण्यात यावेत ! – सौ. रोहिणी तडवळकर

सोलापूर येथे रणरागिणी शाखेकडून चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला या मागणीसाठी आंदोलन !

आंदोलनात घोषणा देतांना उपस्थित महिला

सोलापूर : गणेशोत्सव, दिवाळी या कालावधीत चिनी वस्तूंची खरेदी न करता भारतीय वस्तूंचा आग्रह धरावा. चीनला धडा शिकवण्याची ही संधी आहे. गणेशोत्सव मंडळांनीही चिनी वस्तूंची खरेदी करू नये, असे प्रबोधनपर फलक लावण्यात यावेत. यांमुळे भारतियांचे प्रबोधन होईल, असे प्रतिपादन येथील माजी नगरसेविका सौ. रोहिणी तडवळकर यांनी केले. येथे रणरागिणी शाखेच्या वतीने १६ ऑगस्टला करण्यात आलेल्या आंदोलनात त्या बोलत होत्या. यानंतर तहसीलदार (महसूल) शीतल भामरे-मुळे यांना निवेदन देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी दुकानदारांकडे स्वदेशी उत्पादनांची मागणी करण्याचा आग्रह धरावा, अशी मागणी रणरागिणी शाखेच्या वतीने करण्यात आली.

भारतियांना कुत्रे म्हणणार्‍या चीनला रणरागिणीचे आव्हान ! – कु. गायत्री अक्कलकोटे, विद्यार्थिनी

गेल्या काही मासांपासून भारत अणुपुरवठा गटामध्ये (एन्.एस्.जी.) सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहे; परंतु यामध्ये अडथळे निर्माण करणारा देश चीन आहे. शत्रूराष्ट्र पाकिस्तानला या गटात सहभागी करण्यास साहाय्य करणारा देशही चीन आहे. यावरून चीन हा आपला शत्रू आहे कि मित्र हे आपणच ठरवावे. भारतियांना कुत्रे म्हणणार्‍या चीनला रणरागिणींच्या वतीने मी आव्हान करते की, भारतीय शांत आहेत, तर शांतच राहू दे, अन्यथा नवा इतिहास लिहायला कागद उरणार नाही आणि वाचायला शत्रू रहाणार नाही.

चिनी वस्तू खरेदी करणे म्हणजे स्वत:ला मृत्यूच्या दारात लोटल्यासारखे ! – कु. शुभांगी सातपुते, सोलापूर

आपण चिनी वस्तू खरेदी केल्यावर तो पैसा चीनमध्ये जातो. चीन मात्र आपल्याविरुद्ध युद्ध करण्याच्या सिद्धतेत आहे. एक चिनी वस्तू खरेदी करणे म्हणजे स्वत:लाच मृत्यूच्या दारात लोटल्यासारखे आहे.

आंदोलनाचे फेसबूक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्याद्वारे ९ सहस्र ४२९ जणांनी आंदोलन पाहिले.

क्षणचित्रे 

१. पावसाच्या सरी आल्याने वरुणदेवाचा आशीर्वाद लाभल्याचे उपस्थितांना जाणवले.

२. आंदोलनाच्या वेळी प्रत्यक्ष दुर्गादेवी उभी आहे आणि सर्व महिला म्हणजे तिचे हात असल्याचे जाणवले.

३. आंदोलनाच्या वेळी कु. इच्छा साळुंखे (वय १० वर्षे) हिने यापुढे चिनी वस्तू खरेदी न करण्याचा निर्धार केला असल्याचे मनोगत व्यक्त करतांना सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *