मांजरवाडी (वेदापूर) (जिल्हा सातारा) : स्वातंत्र्योत्तर भारतात पुष्कळ गैरप्रकार, तसेच सामाजिक दुष्प्रवृत्तीही अस्तित्वात आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे. धर्मशिक्षणाअभावी हिंदू निद्रिस्त आहेत. यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले. येथे १५ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. गावकर्यांनी या सभेचा लाभ करून घेतला.
सभेपूर्वी अधिवक्ता सांगोलकर यांनी येथील ग्रामदैवत श्री विठ्ठलाची मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा यांना पुष्पहार अर्पण केला. श्री. आशिष कापसे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख आणि परिचय करून दिला.
क्षणचित्रे
१. मांजरवाडी गावातील धर्माभिमानी मुलांनी स्वत:हून सभेचे आयोजन केले होते.
२. गावातील धर्माभिमानी मुलांनी समितीच्या कार्यकर्त्यांना समवेत घेऊन गावकर्यांना सभेचे निमंत्रण दिले.
३. धर्माभिमान्यांनी धर्मशिक्षणवर्गाची मागणी केली आहे.
४. सभेनंतर २२ मुलांनी वक्त्यांशी चर्चा करून शंकानिरसन करून घेतले.
५. सभा झालेल्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील ध्वनीक्षेपकाची व्यवस्था अशी केली आहे की, त्याद्वारे गावातील प्रत्येक घरामध्ये आवाज स्पष्टपणे पोहोचतो. सर्वांनाच सभेचा लाभ घेता आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात