-
नाशिक येथे महापालिका आयुक्तांना निवेदन !
-
धर्मविरोधी उपक्रम बंद न केल्यास हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आंदोलनाची चेतावणी
नाशिक : दहा किलोच्या कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीमुळे १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित होते, असे हरित लवादाने मान्य केले आहे. त्यामुळे अशा प्रकारे प्रदूषण करणारी कागदी लगद्याची मूर्ती पर्यावरणपूरक आहे, असे म्हणणे म्हणजे जनतेची फसवणूकच आहे. शासनानेही या आदेशाचे पालन करावे आणि याविषयी समाजात जागृती करावी, तसेच गणेशभक्तांनी तथाकथित पुरोगाम्यांकडून चालू असलेल्या अवैज्ञानिक प्रचाराला भुलू नये, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीने १४ ऑगस्ट या दिवशी येथील महापालिका आयुक्त श्री. अभिषेक कृष्णा यांना दिले. हे धर्मविरोधी उपक्रम बंद न केल्यास हिंदुत्वनिष्ठ संघटना तीव्र आंदोलन करतील, अशी चेतावणीही समितीने दिली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात