यवतमाळ : श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम हौद न बांधता विहिरी स्वच्छ करून देऊ, असे आश्वासन येथील नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. कांचनताई चौधरी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना दिले.
मागील वर्षी कृत्रिम हौद बांधून त्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. त्यामुळे श्री गणेशमूर्तींची विटंबना झाली. या वर्षी अशी विटंबना होऊ नये, यासाठी या संदर्भातील निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षा सौ. चौधरी यांना दिले.
या वेळी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यात किंवा नैसर्गिक स्रोतात का करावे, यामागील धर्मशास्त्र सांगून आपण मूर्तींची विटंबना रोखून धर्मरक्षणाचे कार्य करावे, अशी विनंती हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षा सौ. चौधरी यांना केली. त्यावर त्यांनी यंदाच्या वर्षी कृत्रिम हौद न बांधता विहिरी विसर्जनासाठी सिद्ध करू, असे आश्वासन दिले. (नैसर्गिक स्रोतात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विहिरी स्वच्छ करून देण्याचे आश्वासन देणार्या नगराध्यक्षा सौ. कांचनताई चौधरी यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात