यवतमाळ : येथील नगर परिषद टाऊन हॉल, येथे यवतमाळ (वडगाव) पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित शांतता समिती सभेत श्री गणेशोत्सव या विषयावर मार्गदर्शनासाठी हिंदु जनजागृती समितीला बोलावण्यात आले होते. श्री. मंगेश खान्देल यांनी आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा या विषयावर मार्गदर्शन केले. मागील वर्षी श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौदामुळे श्री गणेशाची झालेली विटंबना याविषयीही गणेशोत्सव मंडळांना अवगत करण्यात आले. या वर्षी श्री गणेशाची विटंबना करू नये, असे आवाहन करण्यात आले.
या वेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक एम्. राजकुमार, नगराध्यक्षा सौ. कांचनताई चौधरी यांची उपस्थिती होती. या मार्गदर्शनाचा लाभ यवतमाळ शहरातील ७० पेक्षा अधिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात