Menu Close

अंनिसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कराड (जिल्हा सातारा) येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन

कराड (जिल्हा सातारा) : विवेकवादाचा बुरखा पांघरणारे आणि दाभोलकरांच्या हत्येच्या तपासकामी दबाव निर्माण करण्यासाठी राज्यभर ‘जवाब दो’ ची दवंडी पिटणारे अंनिसवाले त्यांच्या ट्रस्टने केलेल्या घोटाळ्यांविषयी मात्र गप्प आहेत. दाभोलकरांवर श्रद्धा ठेवून अंनिसला दान करणाऱ्यांचा पैसा कुठे जातो, याचा जवाब अंनिसनेच दिला पाहिजे. अंनिसला दान केलेल्या आणि कुठेही न दाखवलेल्या मालमत्ता गिळंकृत करणाऱ्यांच्या वादातून तर दाभोलकरांची हत्या झाली नाही ना, याचा तपास अन्वेषण यंत्रणा आणि शासनाने केला पाहिजे आणि अंनिसवाल्यांनो, तुमच्या घोटाळ्यांचा जवाब द्या !, अशी मागणी करत समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथे आंदोलन केले. हे आंदोलन १९ ऑगस्टला दत्त चौकात करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते अभय वर्तक, हिंदु एकता आंदोलनचे श्री. संग्राम पवार, श्री. हिंदुराव पिसाळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. प्रदीप साळवी, श्री. आेंकार माने, श्री. विक्रांत यादव, धर्मजागरणचे श्री. गणेश महामुनी भाजप श्री. रूपेश मुळे, शिवसेनेचे श्री. शशिराज करपे, श्री. निखिल शहा आदी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

तपास यंत्रणा अंनिस ट्रस्टच्या अपहारांकडे दुर्लक्ष का करत आहे ? – श्री. अभय वर्तक

दाभोलकर हयात असतांना माझी खुशाल चौकशी करा, असे म्हणत. मग आज त्यांचे उत्तराधिकारी ट्रस्टच्या चौकशीला का घाबरत आहेत ? ज्या अर्थी दाभोलकर कुटुंबीय माहितीचा खुलासा करत नाहीत, म्हणजेच नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे. अन्वेषण यंत्रणा सनातनची चौकशी करतात; पण अंनिस ट्रस्टच्या अपहारांकडे दुर्लक्ष का करत आहे ?

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *