Menu Close

हिंदु मच्छीमारांवर केलेल्या आक्रमणात एका गर्भवती हिंदु महिलेच्या पोटावर लाथ मारल्याने झाला गर्भपात !

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर जिहाद्यांकडून होणारे आघात चालूच !

दादरी हत्याकांडानंतर हिंदु असहिष्णु आहेत अशी ओरड करणारे अशा घटनावंर काहीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

Khansama_incident

ढाका (बांगलादेश) : बांगलादेशच्या दिनाजपूर जिल्ह्यातील खान्समा उपजिल्ह्यामध्ये काही धर्मांधांनी हिंदु मच्छीमारांवर आक्रमण केले. या वेळी ५ निष्पाप हिंदु महिला आणि मुले यांना अमानुष मारहाण करण्यात आली. (हिंदुबहुल भारतात अल्पसंख्यांकांवर कथित आक्रमण झाले, तरीही एकजात धर्मनिरपेक्षतावादी हिंदूंवर तुटून पडतात; मात्र बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर स्वातंत्र्यकाळापासून आक्रमणे होत असतांना त्यांना साहाय्य करण्यासाठी तेथे एकही धर्मनिरपेक्षतावादी नाही; कारण मुसलमानबहुल देशात कोणीही धर्मनिरपेक्ष नसतो, हे लक्षात घ्या ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात )

१. एका गर्भवती हिंदु महिलेच्या पोटावर लाथ मारण्यात आली. त्यामुळे तिचा गर्भपात झाला.

२. अन्य महिलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. पुरुषांनाही मारहाण करण्यात आली.

३. त्यांनी मासेमारीसाठी वापरलेले जाळे आणि नौका लुटण्यात आल्या.

४. या घटनेची माहिती मिळताच बांगलादेश मायनॉरिटी वॉचच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडितांशी संपर्क साधला. त्यांच्यावरील अत्याचाराची माहिती करून घेतली.

५. त्यानंतर त्यांनी दिनाजपूर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. याप्रकरणी आरोपींना अटक करून सत्र न्यायाधिशाच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

६. या प्रकरणी खान्समा पोलीस ठाण्यामध्ये २१ धर्मांध आक्रमकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यांत महंमद पिंटू सरकार, महंमद रहिमुद्दीन, महंमद मुस्तफा, महंमद सलिमुद्दीन, इस्माईल हुसेन, महंमद सरीमुद्दीन इत्यादींचा समावेश आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *