अकोला : येथील श्री जलाराम मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने माहितीच्या अधिकाराच्या वापराविषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला अधिवक्त्या श्रीमती वैशाली गावंडे, आदित्य शैक्षणिक आणि बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. अमोल देवगिरीकर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर हे उपस्थित होते. शिबिराला २५ धर्माभिमान्यांची उपस्थिती होती.
अधिवक्त्या श्रीमती वैशाली गावंडे यांनी उपस्थितांना माहितीच्या अधिकाराचा अर्ज कसा करावा, दस्तावेज हवे असल्यास किंवा तपासायचे असल्यास कशा प्रकारे अर्ज करावा याविषयीचे प्रायोगिक करून दाखवले. श्री. अमोल देवगिरीकर यांचा सामाजिक कार्यात पुष्कळ सहभाग आहे. त्यांनी माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून विविध माहिती मागवली. माहितीच्या अधिकाराचा भ्रष्टाचार कसा थांबवू शकतो, याविषयीही सांगितले.
अधिवक्त्या श्रीमती गावंडे यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर असलेली श्रद्धा !
झेंडावंदन करून परतत असतांना त्यांची गाडी घसरली आणि पायाला दुखापत झाली. असे असतांनाही त्यांनी शिबिरात येऊन मार्गदर्शन केले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच मी शिबिराला उपस्थित राहू शकले, असे त्यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात