Menu Close

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण : महिलांवर लैंगिक अत्याचार !

अशा असंवेदनशील आणि हिंदुद्रोही प्रसारमाध्यमांचा जितका निषेध करावा, तितका थोडाच !
हिंदूंनो, रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण अथवा दादरी हत्याकांडावरून पूर्ण देश ढवळून काढणार्‍या धर्मनिरपेक्षतावादी प्रसारमाध्यमे बांगलादेशी हिंदूंच्या प्रतिदिन होणार्‍या हालअपेष्टांकडे कानाडोळा करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

  • ब्राह्मणबारिया जिल्ह्यामधील बंचरामपूर तालुक्यातील घटना !

  • १५ हिंदु घायाळ, ३ घरांचीही मोडतोड !

ढाका (बांगलादेश) : बांगलादेशच्या ब्राह्मणबारिया जिल्ह्यामधील बंचरामपूरच्या पुरबाहाटी दासपारा गावामध्ये धर्मांधांनी हिंदूंच्या घरांवर आक्रमण करून घरांची मोडतोड केली. महिलांवर लैंगिक अत्याचारही केले. या आक्रमणात लहान मुले आणि महिला यांच्यासह १५ जण गंभीररीत्या घायाळ झाले आहेत. जखमींना ढाका वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले आहे.

विस्तृत माहिती अशी…..

१. काही दिवसांपूर्वी मंहमद झिहाद नावाच्या व्यक्तीने गावातील हिंदु दुकानदार श्री. कालीदास यांच्याकडे उधारीवर सिगारेट देण्याची मागणी केली. श्री. दास यांनी त्यास नकार दर्शवला.

२. यावरून चवताळलेल्या महंमद झिहाद याने धर्मांधांना भडकावले आणि सुमारे ५० ते ६० धर्मांधांनी शस्त्रास्त्रांसह हिंदूंच्या घरांवर आक्रमण केले.

३. हिंदूंना मारहाण करण्यात आली. हिंदूंची ३ घरे लुटली गेली आणि महिलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले.

४. मारहाणीत १५ हिंदू घायाळ झाले आहेत. ६० वर्षीय दुकानदार कालीदाससहित सुमोन सरकार, हरेकृष्ण दास, मूर्ती दास, संजित दास इत्यादींचा घायाळांमध्ये समावेश आहे.

५. या प्रकरणी बंचरामपूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. नजरुल इस्लाम, सकील, चांद मीयां, बादशाह मीयां, कमाल होसेन इत्यादी आरोपींचा शोध चालू आहे.

६. बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अधिवक्ता रवींद्र घोष यांनी पोलिसांशी संपर्क साधला असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *