५८९ विद्यार्थ्यांकडून प्रदर्शनाचा लाभ; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) : येथील साई इंटरनॅशनल स्कूल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतिकारकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. ५८९ विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. शिक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१. प्रदर्शन व्यवस्थित पहाता येण्यासाठी शिक्षकांनी टप्प्याटप्याने प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्याला प्रदर्शन पहायला सोडले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्ण प्रदर्शन समजून घ्यायला बराच वेळ मिळाला.
२. विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ प्रदर्शन लावण्यासाठी शिक्षकांनी भूमी आणि पटल स्वतःच उपलब्ध करून दिले.
३. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ग्रंथ पाहून त्यांची मागणी देण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी २८ मोठे ग्रंथ, तर ७२ लघुग्रंथ यांची मागणी केली. यामध्ये ‘अभ्यास कसा करावा ?’ या मोठ्या ग्रंथाची मागणी अधिक आहे. ‘यापुढेही समितीच्या वतीने असे उपक्रम आमच्या शाळेत राबवावेत’, असे शिक्षकांनी सांगितले. या सेवेमध्ये समितीच्या डॉ. (सौ.) सुषमा अथणी, सौ. अरुणा पेडणेकर होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात