पावसात भिजत हिंदु राष्ट्र जागृती सभेची धर्माभिमान्यांकडून पूर्वसिद्धता !
माळशिरस (जिल्हा सोलापूर) : यशाचे सूत्र संख्याबळ नव्हे, तर भक्ती आणि निष्ठा आहे. गेल्या ७० वर्षांत लोकशाहीने आपल्याला काय दिले ? आज दरडोई ५४ सहस्त्र रुपये कर्ज आहे. ३०० जिल्हे संवेदनशील आहेत. त्या ठिकाणी समांतर शासन चालते. प्रत्येक ३२ व्या मिनिटाला महिलेवर बलात्कार होतो. आशिया खंडात सर्वांत भ्रष्ट भारत देश आहे. ६९ टक्के लोक लाच देतात. न्यायालयात ३०० कोटी खटले प्रलंबित आहेत. अशा अपयशी लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी हिंदूंचे व्यापक धर्माधिष्ठीत हिंदूसंघटन हेच हिंदु राष्ट्र निर्मितीचे बीज आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी केले. येथील मराठी शाळेजवळील, अहिल्यादेवी सभागृह येथे २० ऑगस्ट या दिवशी झालेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती सभे’मध्ये ते बोलत होते.
या सभेला तिरवंडी, मेडद, मांडकी, कचरेवाडी, खुडूस, उंबरे, कन्हेरे, मोटेवाडी, वटफळी, माळशिरस आणि अन्य दोन अशा १२ गावांतून धर्मप्रेमी जात, पद, संप्रदाय बाजूला ठेवून हिंदूसंघटन होण्यासाठी सभेला उपस्थित राहिले.
क्षणचित्रे
१. हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांचा येथील नगरसेवक श्री. मारुति आप्पा देशमुख यांनी फेटा घालून सन्मान केला.
२. सभेसाठी सभागृह स्वच्छता, प्रदर्शन लावणे, ध्वनीक्षेपक यंत्रणा आणि अन्य सेवा पाऊस असतांनाही श्री. रामचंद्र कचरे आणि अन्य धर्मप्रेमींनी केली. (पावसाची पर्वा न करता सभेची सिद्धता करणाऱ्या धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात