सांगली : आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बत्तीस शिराळा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाजपचे नगरसेवक श्री. उत्तम डांगे यांना, तर भाजप नगरसेविका सौ. सीमा कदम यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. भरत जैन आणि हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) भारती जैन उपस्थित होत्या. राष्ट्रध्वज अवमानप्रकरणी श्री. उत्तम डांगे यांनी कारवाई होण्यासाठी मोर्चा काढला होता, त्यासाठी समितीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे श्री गणेशमूर्तीदान नको, विसर्जनासाठी कृत्रिम तलाव नको, तसेच अन्य मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. रवींद्र तेली यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेच्या अंतर्गत मंगळुरू (कर्नाटक) आणि कोलथुर (तमिळनाडू) येथे विविध उपक्रम
मंगळुरू (कर्नाटक) येथे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन
मंगळुरू (कर्नाटक) : सार्वजनिक गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्यासाठी या उत्सवातील अपप्रकारांना आळा घालावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पोलीस आयुक्त सुरेश टी. आर्., पोलीस अधीक्षक सुधीर रेड्डी आणि मंगळुरू पोलीस महानिरीक्षक हरिशेखरन्, तसेच प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रभाकर नायक, उपेंद्र आचार्य, धर्मप्रेमी उदय शंकर, सतिश, चिन्नू प्रसाद, डी. राज, सौ. उमा, सौ. विनय गौडा. अधिवक्त्या (कु.) दिव्या बालेहित्तिल आदी उपस्थित होते.
दक्षिण भारतातील कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. तेथेही उत्सवात अपप्रकार वाढीस लागले आहे. त्यावर आळा बसण्यासाठी हिंदु जनजागृती समिती विविध उपक्रम राबवत आहे. तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोलथुर, चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेश चतुर्थीवर व्याख्यान
चेन्नई : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोलथूर येथील ‘श्री वीर सावरकर मॅट्रीक्युलेशन स्कूल’मध्ये ‘श्री गणेशचतुर्थी’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. या व्याख्यानाचा शाळेतील १६७ विद्यार्थी आणि १० शिक्षक यांनी लाभ घेतला. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनायक शानभाग यांनी श्री गणेशचतुर्थीचे महत्त्व, श्री गणेशाची विविध नावे आणि वैशिष्ट्ये इत्यादींविषयी माहिती दिली. शाळेच्या व्यवस्थापनाने शाळेत ३ दिवस श्री गणेशचतुर्थी उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रमा यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडे प्रतिक्रिया व्यक्त करतांना, या वर्षी शाळेत श्री गणेशचतुर्थी उत्सव व्याख्यानात सांगितल्यानुसार साजरा करण्यात येणार असल्याचे सांगितले. समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments