हिंदु जनजागृती समितीचे प्रयाग येथील बार असोसिएशनच्या अधिवक्त्यांना मार्गदर्शन
प्रयाग (अलाहाबाद) : येथे श्रावण मासात ७ ठिकाणी भगवान शिवाच्या मूर्ती तोडण्यात आल्या, कावडियांवर आक्रमण करण्यात आले; मात्र हिंदूंचे संघटन आणि जागृती यांच्या अभावी या घटना थांबवण्याचे कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. अशाच प्रकारचे अनेक आघात भारतभरातील वेगवेगळ्या भागांत होत आहेत, हे थांबवण्यासाठी सर्व हिंदूंना संघटित झाले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी येथील ‘सेल्स टॅक्स बार असोसिएशन’च्या बैठकीत केले.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरात अवैध मशिदीचे बांधकाम करण्यात आले. या विरोधात न्यायालयीन लढाईसाठी प्रयत्न करणारे अधिवक्ता अभिषेक शुक्ला म्हणाले, ‘‘ही मशीद अवैध असतांनाही तिच्या न्यायालयीन कारवाईच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मुसलमान उपस्थित होते. याउलट अवैध मशिदीच्या बांधकामाला विरोध करण्यासाठी समाजातून आवाज उठवला गेला नाही.’’
या बैठकीसाठी अधिवक्ता अरविंद मिश्रा यांनी सहकार्य केले. सर्व अधिवक्त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म यांविषयी कार्याचे कौतुक केले आणि यापुढे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात योगदान देण्याचा निर्धार केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात