Menu Close

बंगालमध्ये ममता(बानो) बॅनर्जी सरकारकडून यावर्षीही मोहरमच्या दिवशी दुर्गामूर्ती विसर्जनावर बंदी

  • बंगाल भारतात आहे कि बांगलादेशात ? हिंदूंच्या मिरवणुका मशिदीसमोरून गेल्या, तर त्यांना वाद्य वाजवण्यास बंदी घातली जाते, मिरवणुकांवर मशिदीतून आक्रमण केले जाते. मोहरमच्या विरोधात अशी एकतरी कृती हिंदूंकडून कधी केली गेली आहे का ? तरीही या देशात हिंदूंच्या धार्मिक उत्सवांवर निर्बंध घातले जातात, हा निधर्मीवाद नसून धर्मांधताच आहे ! ही स्थिती हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दर्शवते !

  • गेल्या वर्षी न्यायालयाने फटकारल्यानंतरही पुन्हा तोच निर्णय घेणार्‍या ममता बॅनर्जी न्यायालयाचा अवमान करत असल्याने केंद्र सरकारने त्यांचे सरकार विसर्जित करून बंगालमधील हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक अधिकारांचे रक्षण केले पाहिजे !

  • ममता बॅनर्जी यांना निवडून देणारे बंगालमधील हिंदू आतातरी शहाणे होतील, अशीच अपेक्षा !

  • भाजपच्या एखाद्या राज्यात मुसलमानांच्या धार्मिक उत्सवावर अशी बंदी घातली असती, तर देशातील एकजात निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी यांनी ऊर बडवण्यास चालू केले असते, लेखकांनी पुरस्कार परत केले असते !

कोलकाता – बंगालमधील ममता(बानो) बॅनर्जी यांच्या सरकारकडून याही वर्षी मोहरममुळे दुर्गामूर्ती विसर्जनासाठी एक दिवसाची बंदी घालण्यात आली आहे. ३० सप्टेंबरच्या सायंकाळ ६ वाजल्यापासून १ ऑक्टोबरपर्यंत दुर्गामूर्ती विसर्जनावर ही बंदी असणार आहे. मोहरमच्या मिरवणुकीमुळे ही बंदी घालण्यात आली आहे, असे ममता (बनो) बॅनर्जी यांनी सांगितले. तसेच देवीभक्तांनी सायंकाळी ६ पूर्वी मूर्तीचे विसर्जन करावे, असा शहाजोगपणाचा सल्लाही दिला आहे. यावर्षी १ ऑक्टोबरला मोहरम आहे, तर ३० सप्टेंबरला विजयादशमी आहे. गेल्या वर्षी ११ ऑक्टोबरला दसरा, तर १२ ऑक्टोबरला मोहरम होता. तेव्हाही अशीच बंदी घालण्यात आली होती.

१. कोलकाता येथे २३ ऑगस्टला दुर्गा महोत्सव आयोजकांच्या बैठकीत ममता(बानो) बॅनर्जी यांनी सरकारच्या आदेशाची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, विसर्जन आणि मिरवणूक एकत्र झाल्या, तर समस्या निर्माण होऊ शकते. (अशा समस्या कोण निर्माण करतात आणि का ?, हे ममता(बानो) यांनी जनतेला सांगितले पाहिजे ! – – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या प्रकरणात मला तुमचे सहकार्य हवे आहे. (असे सहकार्य मोहरमच्या आयोजकांकडून का मागण्यात आले नाही ? मूर्ती विसर्जन केल्यानंतर मोहरमच्या मिरवणुका काढा , असे आवाहन त्यांना का करण्यात आले नाही ? – – संपादक, दैनिक सनातन प्रभात) काही जण या घटनेचा लाभ उठवू इच्छितात आणि त्यांच्या हितासाठी ते हिंदु आणि मुसलमान यांचा एक माध्यम म्हणून उपयोग करू इच्छित आहेत. (काही जण नव्हे, तर ममता(बानो)च या घटनेचा राजकीय लाभ उठवून मुसलमानांचे लांगूलचालन करत आहेत ! – – संपादक, दैनिक सनातन प्रभात)  

२. या बैठकीनंतर ममता (बानो) बॅनर्जी यांनी टी्वट करून सांगितले, ‘मोहरमच्या मिरवणुकीचा २४ घंट्याचा कलावधी सोडला, तर २,३, आणि ४ ऑक्टोबरला मूर्ती विसर्जन केले जाऊ शकते. (ममता(बानो) यांनी मुसलमानांना असे का सांगितले नाही की, १ ऑक्टोबरऐवजी २,३ आणि ४ ऑक्टोबरला मोहरमची मिरवणूक काढा ? – – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. गेल्या वर्षी सरकारच्या अशाच निर्णयाच्या विरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. तेव्हा न्यायालयाने ममता (बानो) सरकारला फटकारले होते. ‘एका धर्मियांना खुश करण्याचा हा प्रयत्न आहे , असे न्यायालयाने म्हटले होते. ‘यापूर्वी कधीही दसर्‍याच्या दिवशी मूर्ती विसर्जनावर बंदी घालण्यात आलेली नाही, असेही न्यायालयाने म्हटले होते.

४. न्या. दीपांकर दत्ता यांनी या संदर्भात वर्ष १९८२ आणि १९८३ चे उदाहरण दिले होते. या वर्षांत आदल्या दिवशी दसरा आणि दुसर्‍या दिवशी मोहरम होता, तरी विसर्जनावर बंदी घालण्यात आली नव्हती. ‘एका धर्मियांना दुसर्‍या धर्माच्या लोकांच्या विरोधात उभा करणारा असा कोणताही निर्णय घेणे योग्य नाही , असेही त्यांनी म्हटले होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *