Menu Close

कल्याण आणि कळंबोली येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा

कळंबोली : येथे हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी करत असलेले कार्य प्रभावीपणे आणि नियमितपणे साधना म्हणून करण्याचा निर्धार कार्यशाळेतील धर्मप्रेमींनी केला. रायगड जिल्ह्यातून २० धर्मप्रेमी कार्यशाळेत उपस्थित होते. सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत यांनी, तर समितीच्या वतीने श्री. बळवंत पाठक आणि सौ. मोहिनी मांढरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

सहकार्य : कळंबोली येथील समाजसेवक श्री. माणिकराव पवार आणि शाळेचे संस्थापक, तसेच नगरसेवक श्री. सतीश पाटील यांनी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. श्रीकृष्ण मिठाई दुकानाचे मालक श्री. प्रकाश चौधरी आणि सवीन केटरर्स यांनी चहाची व्यवस्था केली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


कल्याण येथे धर्मप्रेमींची कार्यशाळा

उत्स्फूर्तपणे घोषणा देतांना कार्यशाळेतील धर्मप्रेमी

कल्याण – येथे २४ ऑगस्टला धर्मप्रेमींसाठी एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगितला, तर श्री. सागर चोपदार यांनी गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व विशद केलेे. आंदोलनाला अनुमती घेणे आणि हिंदु धर्मसभेसाठी व्यावसायिकांकडून अर्पण कसे घ्यावे या संदर्भात श्री. सागर चोपदार यांनी प्रायोगिक भाग घेतला. या वेळी नामजप, सूक्ष्मातील प्रयोग आणि गटचर्चा घेण्यात आली.

क्षणचित्रे

१. धर्मप्रेमी श्री. सागर शुक्ल हे १२ आणि १३ ऑगस्टला उल्हासनगर येथे झालेल्या कार्यशाळेतही सहभागी झाले होते. त्यांच्या पुढाकाराने ही दुसरी कार्यशाळा पार पडली.

२. कार्यशाळेसाठी आयकॉन प्लाझा या सभागृहाचे मालक श्री. समर्थ वखरे यांनी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *