Menu Close

कल्याण येथे हिंदूंवरील आघातांच्या विरोधात धर्मप्रेमी संघटनांचा मूक मोर्चा !

‘कल्याण येथे १६.७.२०१७ या दिवशी अमरनाथ यात्रेवरील आक्रमण आणि बंगालमधील हिंदूंवर धर्मांधांकडून सातत्याने होणारी आक्रमणे, यांच्या निषेधार्थ राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत मूक मोर्चा काढण्यात आला.

यात हिंदु महामंडलम्, शंभुराजे युवा प्रतिष्ठान, हिंदु शक्ती वाहिनी, स्वराज्य मित्र मंडळ, बजरंग दल, लायन हार्ट ग्रुप, हिंदु राष्ट्र सेना, भाजप, मनसे, शिवसेना, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी प्रारंभी कल्याण येथील टिळक चौकातील टिळकांच्या प्रतिमेला हार घालण्यात आला. त्यानंतर टिळक चौकातून शंकरराव चौक येथे मूक मोर्चा काढण्यात आला.

मोर्च्यात ७० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. या वेळी हातात निषेधाचे फलक घेऊन घोषणा देत निषेध करण्यात आला. या आंदोलनाच्या प्रसारात आणि आयोजनात हिंदु महामंडलम्चे श्री. सागर शुक्ल आणि श्री. गणेश पवार यांनी पुढाकार घेऊन सेवा केली.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *