हिंदूंना कायदा सांगणारे आणि इतर धर्मियांचा फायदा बघणारे प्रशासन भारताचे कि पाकचे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी मुंबई – उच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करत अतिक्रमण विभागाच्या वतीने रातोरात शहरातील मंदिरे तोडली जात असल्याच्या प्रकरणी नवी मुंबईकरांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. प्रशासनाने नागरिकांच्या धार्मिक भावनांशी खेळू नये. चुकीच्या पद्धतीने होणारी कारवाई थांबवली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी स्थायी समिती सदस्यांनी स्थायी समितीत प्रशासनाला दिली आहे.
१. या संदर्भात विरोधी पक्ष नेते विजय चौगुले म्हणाले, मध्यरात्री धार्मिक स्थळे पाडलेली पाहून आम्ही नक्की भारतामध्येच आहोत का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
२. नामदेव भगत म्हणाले, मध्यरात्रीच्या कारवाईने भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास लाठीमार, गोळीबार होऊन कोणाचा जीव गेला, तर त्याला उत्तरदायी कोण ? तसेच नागरिकांनी पूजेसाठी वसाहतीमध्ये बांधलेली मंदिरेही तोडली जात आहेत. रिक्शाचालकांनी त्यांच्या स्टँडवर उभारलेले देव्हारेही हटवण्यात येत आहेत. रस्ते, पटांगणे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी असलेली बांधकामे हटवण्यास कोणी विरोध करत नाही; परंतु नागरिकांनी श्रद्धेने उभारलेली मंदिरे तोडली जात आहेत.
३. शिवसेनेच्या द्वारकानाथ भोईर यांनी कारवाईच्या पद्धतीवर तीव्र आक्षेप घेत म्हणाले, जी मंदिरे जुनी आहेत, त्यांच्यावरही कारवाया होत आहेत.